शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

गोव्यात भाजपाचा संघाशी दुरावा नाही

By admin | Updated: April 11, 2016 02:34 IST

इंग्रजी माध्यमाच्या १३६ प्राथमिक शाळांना अनुदान चालूच ठेवण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी भाजपा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा एकदा

पणजी : इंग्रजी माध्यमाच्या १३६ प्राथमिक शाळांना अनुदान चालूच ठेवण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी भाजपा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट केले. दुसरीकडे, माध्यम प्रश्नावर संघाशी भाजपाचा कोणताही दुरावा नसल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले.आगामी निवडणुकीत २६ जागा जिंकण्याचे ध्येय पक्षाने ठेवले आहे. त्यासाठी येत्या महिन्यापासून ‘घर चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. तेंडुलकर यांनी माध्यमप्रश्नी सरकार आणि भाजपाचीही भूमिका ठाम असल्याचे सांगितले. संघाशी दुरावा नाहीच, असा दावा करून ते म्हणाले की, भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या व्यासपीठावरून जे कोणी भाजपाविरोधात बोलत असतील आणि काही अंतर्गत वाद असेल, तर तो आपसात मिटवू. भारतीय सभा अथवा बैठकांना पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने तसेच मंत्री किंवा आमदाराने जाऊ नये, असे पक्षातर्फे स्पष्ट बजावले असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदींनी मार्गदर्शन केले. (प्र्रतिनिधी)