शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सूर्य नमस्कार आणि नमाजात फरक नाही- योगी आदित्यनाथ

By admin | Updated: March 29, 2017 19:16 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्य नमस्कार आणि नमाजामध्ये साम्य असल्याचं म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 29 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्य नमस्कार आणि नमाजामध्ये साम्य असल्याचं म्हटलं आहे.  सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिम बांधवांची नमाज पढण्याची प्रक्रिया मिळती जुळती आहे असं ते म्हणाले.
 
सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिम बांधवांच्या नमाज पढण्याच्या प्रक्रियेत साम्य आहे पण आतापर्यंत सत्तेत असलेल्यांनी  सूर्य नमस्कार आणि नमाज यांना कधी जोडण्याचा प्रयत्न केला नाही. सत्तेत असलेल्यांना योग नाही तर 'भोग'ची सवय होती. लखनऊमध्ये आयोजीत 3 दिवसीय योग महोत्सवात योगी बोलत होते.
 
यावेळी बोलताना आदित्यानाथांनी योगाचं महत्व सांगितलं. व्यायामामुळे फिटनेसचा फायदा होतो पण तो एका ठरावीक वेळेपर्यंतच. याउलट  योग करणा-या व्यक्तीचं स्वास्थ्य शेवटपर्यंत उत्तम राहतं. योग करण्यासाठी कोणत्या जाती किंवा धर्माचं बंधन नसतं. काहीजण केवळ प्राणायमला योग मानतात पण योगा बसताना किंवा चालतानाही करता येतो असं ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तीपर्यंत योगा पोहोचवण्याचं काम उत्तर प्रदेश सरकार करेल असं ते यावेळी म्हणाले.