शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

देशव्यापी दारूबंदीची योजना नाही

By admin | Updated: August 3, 2016 05:16 IST

राज्य सरकारांना त्यांच्या राज्यांत दारूबंदी लागू करण्यासाठी आपण मदत करू शकतो.

नवी दिल्ली : राज्य सरकारांना त्यांच्या राज्यांत दारूबंदी लागू करण्यासाठी आपण मदत करू शकतो. तथापि, संपूर्ण देशात मद्यपानावर सरसकट बंदी घालण्याची आपली कोणती योजना नाही, असे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत स्पष्ट केले. त्यामुळे संपूर्ण देशपातळीवर दारूबंदी लागू करण्याचा विचार यापुढे होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, केंद्र सरकार राज्यांना मदत करू शकते. तथापि, राष्ट्रीय पातळीवर दारूबंदीची कोणतीही योजना नाही. मात्र अवैध/विषारी दारूच्या सेवनामुळे देशात २०१२ ते २०१४ दरम्यान २९२७ लोकांना प्राण गमवावे लागले. यापैकी ७३१ जण २०१२ मध्ये, ४९७ जण २०१३ मध्ये, तर १,६९९ लोक २०१४ मध्ये मृत्युमुखी पडले, असेही ते म्हणाले.तसेच २०१४ मध्ये अबकारी करांतर्गत देशभरात २.८३ कोटी लिटर दारू जप्त करण्यात आली असून, यात ९१ लाख लिटर देशी किंवा गावठी दारूचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मद्य कारखान्यांनी उत्पादित केलेली १.१५ कोटी लिटर आणि ७६ लाख लिटर इतर दारूही याच वर्षात जप्त करण्यात आली, असेही हंसराज अहीर यांनी सांगितले. >जप्त के लेलेअवैध पदार्थ विविध अंमलबजावणी संस्थांनी यावर्षीच्या जून महिन्यापर्यंत १,३६६.३५ किलो अ‍ॅम्फेटामाईन, ६.५१ किलो कोकेन, ४४,८११.८२ किलो एफिड्रीन, ३८,४१८ किलो गांजा, १,११४.१२ किलो हशिश, ३५१.१२ किलोे हेरॉईन, १६.५७ किलो केटामाईन, ६६३.१५ किलो अफू, खोकल्याचे औषध फेन्सिडीलच्या २,०५,१५० बाटल्या, अफूची साल १२,९०३.४१ किलो, अफूच्या वाळलेल्या पेंढ्या ३४,०१८.३४ किलो आणि अमली पदार्थ स्युडो इफेड्रीन ४३.७४ किलो एवढे अवैध पदार्थ जप्त केले, अशी माहितीही केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी दिली.