शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

३० सप्टेंबरपर्यंत अघोषित मालमत्ता जाहीर केल्यास कोणतीही कारवाई नाही

By admin | Updated: June 26, 2016 12:35 IST

ज्यांच्याकडं अघोषित मालमत्ता आहे त्यांना सरकारनं एक संधी दिली आहे. संबंधितांनी ३० सप्टेंबरपर्यंत स्वत:हून याची माहिती द्यावी. जर त्यांनी स्वत: सर्व माहीती दिल्यास सरकार कुठलीही चौकशी करणार नाही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ : ज्यांच्याकडं अघोषित मालमत्ता आहे त्यांना सरकारनं एक संधी दिली आहे. संबंधितांनी ३० सप्टेंबरपर्यंत स्वत:हून याची माहिती द्यावी. जर त्यांनी स्वत: सर्व माहीती दिल्यास सरकार कुठलीही चौकशी करणार नाही. असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींयाना केले आहे. ते मन की बात या कार्यक्रमादवारे जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलातील महिला फायटरंना शुभेच्छा दिल्या. २१ तारखेला झालेल्या योगा दिनात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी देशवासींयांचे आभारही मानले. ते म्हाणेले योगाद्वारे आपण जगाशी जोडलो गेलो आहे. योगा हा आपल्या जिवनांचा अविभाज्य भाग आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे. 
 
या कार्यक्रमाच्या 21 व्या भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगला पाऊस पडावा यासाठी इच्छा व्यक्त केली. तसेच नागरिकांनी पावसाचा आनंद घ्यावा, पण थेंब न थेंब साठवून ठेवावा, असेही म्हटले आहे. मोदी म्हणाले की, सरकारने बेकायदेशीररित्या संपत्ती बाळगणाऱ्या नागरिकांना अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ केली आहे. त्यामुळे अश्या लोकांनी 30 सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती उघड करावी. त्यानंतर मात्र कर बुडव्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. स्वेच्छेने अघोषित देशांतर्गत संपत्ती जाहीर करणारे लोक स्वत:वर होणारी दंडात्मक कारवाई होण्यापासून बचाव करू शकणार आहेत.
 
त्याचप्रमाणे आणीबाणीच्या माध्यामांतून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असे बोलत त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा निशाना साधला. २५ जून २०१६ रोजी आणीबाणी ला ४० वर्ष पुर्ण झाली आहेत.  आणिबाणीमुळे इंदिरा गांधी यांच्या हाती अर्निबध सत्ता एकवटली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं यांनी २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या ३५२(१) कलमानुसार २५ जूनच्या रात्री आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि लगेचच आणीबाणी लागू झाली
 

मन की बात मधील काही महत्वाचे मुद्दे - 

 
चंदीगढ मध्ये हजारो योगप्रेमींसोबत योगा करण्याचा आनंद मिळाला, छोट्या - मोठ्यांचा उस्ताह पाहण्यासारखा होता. योगामध्ये जगाला जोडण्याची ताकद, सगळ्यांनी एकत्र यावे. 
 
सर्वच क्षेत्रात मुली वेगाने प्रगती करत आहेत, भारतीय हवाई दलात प्रथमच दाखल झालेल्या तीन महिला फायटर पायलट अवनि, मोहना, भावना यांना पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या...
 
शेतकरी जसा मेहनत करतो, त्याचप्रमाणे देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी वैज्ञानिकही कष्ट घेत आहेत... 
 
'इस्रो'नं अवकाशात सोडलेल्या, तसंच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या उपग्रहांना माझ्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे... हे सर्व विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेत...
 
इस्रोची कामगीरी उलेखनिय आहे. नव्या पिढीने वैज्ञांनिक होण्याचे स्वप्न पाहवे.
 
योगविषयक अनुभव #YogaFightsDiabetes या हॅशटॅगसह सोशल मीडियावर किंवा NarendraModiApp वर पाठवण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन...
 
देशातील शेतकरी आणि वैज्ञांनाकांची कामगीरी उल्लेखनीय
 
लोकशाही हीच देशाची खरी ताकद, लोकसहभागातून देशाची उन्नती व्हायला पाहिजे
 
सरकार आणि जनतेतील अंतर कमी व्हायला पाहिजे