शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘कोहिनूर’ मिळवण्याचे पर्याय नाहीत

By admin | Updated: September 22, 2016 04:19 IST

जगातील सर्वात अमूल्य हिरा कोहिनूर भारताचा आहे.

नवी दिल्ली : जगातील सर्वात अमूल्य हिरा कोहिनूर भारताचा आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय करार आणि कायद्यांमुळे त्याला ब्रिटनकडून कायदेशीररीत्या परत मागता येत नाही, असे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. कोहिनूरबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले. हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांना भेट दिल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तो परत आणण्याचे कायदेशीर पर्याय नसले तरी परदेशाशी करार करून तो परत आणता येऊ शकेल काय, याची चाचपणी सुरू आहे. ब्रिटनकडून कोहिनूर परत मिळविण्यासाठी पुरेसे कायदेशीर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुत्सद्दी मार्गांचा अवलंब करावा लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी कायदे आणि करारांची मदत होऊ शकणार नाही, असे सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने शपथपत्रात म्हटले आहे की, ‘अ‍ॅन्टीक्विटीज अ‍ॅण्ड आर्ट ट्रेझर्स अ‍ॅक्ट १९७२’च्या माध्यमातून कोहिनूरच्या वापसीसाठी दावा करता येणार नाही. कारण, एखादी पुराणवस्तू हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी देशाबाहेर गेली असेल, तर संबंधित देशाला ती परत मिळविण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर करता येत नाही. पुराणवस्तूसंबंधीच्या युनेस्को कराराचीही मदत होऊ शकत नाही. कारण, हा हिरा देशाबाहेर गेल्यानंतर कितीतरी काळाने उभय देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. युनेस्कोचा हा करार स्वाक्षरी करणाऱ्या देशांच्या वस्तुसंग्रहालयांना एकमेकांच्या पुराणवस्तू आणि सांस्कृतिक वारसा हस्तगत करण्यास मज्जाव करतो. ब्रिटिश उच्चायुक्तांकडे कोहिनूर परत मागण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>हिऱ्यात भारतीय लोकांच्या भावना गुंतल्या आहेत...सरकारने शपथपत्रात म्हटले आहे की, ‘अ‍ॅन्टीक्विटीज अ‍ॅण्ड आर्ट ट्रेझर्स अ‍ॅक्ट १९७२’च्या माध्यमातून कोहिनूरच्या वापसीसाठी दावा करता येणार नाही. कारण, एखादी पुराणवस्तू हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी देशाबाहेर गेली असेल, तर संबंधित देशाला ती परत मिळविण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर करता येत नाही.या हिऱ्यात भारतीय लोकांच्या भावना गुंतल्या असल्याची आपणास पूर्ण जाणीव आहे, असे सरकारने शपथपत्रात नमूद केले.