शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातांत दीड लाख लोकांचा होतो मृत्यू

By admin | Updated: March 10, 2017 00:45 IST

देशात दरवर्षी ५ लाख अपघात होऊन त्यात दीड लाख लोक प्राण गमावतात, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.

नवी दिल्ली : देशात दरवर्षी ५ लाख अपघात होऊन त्यात दीड लाख लोक प्राण गमावतात, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. देशात दरवर्षी होणाऱ्या सुमारे ५ लाख अपघातांत दीड लाख लोकांचा बळी जातो ही शोचनीय बाब असून, अपघाताच्या प्रचंड प्रमाणाला कुठे ना कुठे रस्ते अभियांत्रिकीही जबाबदार आहे, असे गडकरींनी शून्य प्रहरात सांगितले. गडकरी म्हणाले की, रस्त्यावरील मृत्यू आणि अपघातांची संख्या कमी करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी खेडी आणि शहरांतून जाणाऱ्या महामार्गांवर अधिक उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत. 14268 कि.मी.चे रस्ते चौपदरी करण्यात येत आहेत. हे काम मे २०१९पर्यंत पूर्ण होणार असून, त्यावर १ लाख ८३ हजार १८० कोटी रुपये खर्च होतील. 62.42 हजार कोटी २०१६-१७ मध्ये विविध राज्यांतील राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण आाणि त्यांच्या विकासावर खर्च झाले आहेत.43721 कोटी रुपयांचा पथकर देशात गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय महामार्गावर वसूल करण्यात आला आहे, असेही गडकरींनी सांगितले.