शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

...तर व्हॉटस् अ‍ॅप होणार पेड

By admin | Updated: July 1, 2015 16:57 IST

इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉईस आणि टेक्स्ट मेसेजिंगची सेवा देणाऱ्या व्हॉटस् अ‍ॅप, स्काईप या सेवांची गणना देखील दूरसंचार सेवेप्रमाणे करत त्यांचा समावेश इंडियन टेलिग्राफ अ‍ॅक्टमध्ये

मनोज गडनीस , मुंबईइंटरनेटच्या माध्यमातून व्हॉईस आणि टेक्स्ट मेसेजिंगची सेवा देणाऱ्या व्हॉटस् अ‍ॅप, स्काईप या सेवांची गणना देखील दूरसंचार सेवेप्रमाणे करत त्यांचा समावेश इंडियन टेलिग्राफ अ‍ॅक्टमध्ये करावा आणि त्यांच्याकडून परवाना शुल्क आकारावे असा प्रस्ताव दूरसंचार विभागाच्या अंतर्गत समितीने तयार केला आहे. या प्रस्तावावर जर मंजुरीची मोहोर उमटली तर वॉटस् अ‍ॅप, स्काईप आणि तत्सम सेवांनाही परवाना शुल्क भरावे लागेल आणि त्यामुळे त्याच्या सेवामूल्यात वाढ होऊन अखेरीस ती ग्राहकाच्याच शिखातून वसूल केली जाईल. या घडामोडींची जवळून माहिती असलेल्या एका तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या घडीला दूरसंचार कंपन्यांतर्फे व्हॉईस अर्थात नियमित व्हॉईस कॉलिंग आणि टेक्स्ट सेवा पुरविली जाते.या सेवा देण्याकरिता आवश्यक त्या तांत्रिक गरजांची पूर्तता करण्यासाठी या कंपन्यांना परवाना शुल्क भरावे लागते. याचधर्तीवर इंटरनेटच्या आधारे व्हॉईस आणि टेक्स्टची सेवा देणाऱ्या अ‍ॅप्सना वेगळा न्याय कशासाठी, या तर्काच्या आधारे हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव दूरसंचार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असे वृत्त आहे. मेसेजिंग संशोधनावर होणार परिणामएकिकडे केंद्र सरकार डिजिटल क्रांतीवर भर देत असताना जर अशाप्रकारे तंत्रज्ञानासाठी परवाना पद्धती लागू झाली तर व्हॉईस, व्हिडिओ, मेसेजिंगचे नवीन आविष्कार विकसित होणार नाहीत. या उलट नव्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सरकारने काही प्रोत्साहन योजना जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या सेवांसाठी नियमावली तयार करतानाच परवाना शुल्क आकारण्याचा मुद्दा आता सरकारी प्रस्तावात आला असला तरी याचा मोठा फटका तंत्रज्ञान क्रांतीला बसेल,असाही सूर दुसरीकडे उमटत आहे. न्यूट्रॅलिटीचा मुद्दादोन महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या नेट न्युट्रॅलिटीच्या अनुषंगाने हा विषय चर्चेत आला आहे. नेट न्युट्रॅलिटीमध्ये प्रमुख मुद्दा होता तो, इंटरनेटवरून मिळणाऱ्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करण्याचा. निवडक सेवा सशुल्क करण्याबाबत आक्षेप होता. याच आधारे आता दूरसंचाल कंपन्यांनी व्हॉईस आणि टेक्स्टचा मुद्दा उचलला असून अ‍ॅप कंपन्यांनाही परवाना शुल्क लावण्याची मागणी पुढे रेटल्याची चर्चा आहे.