शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

....तर 500 आणि 2000च्या नोटाही चलनातून होणार बाद

By admin | Updated: March 9, 2017 16:14 IST

500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर होळीचा रंग लागल्यास बँक त्या नोटा स्वीकारणार नाही

ऑनलाइन लोकमतफरिदाबाद, दि. 9 - तुम्ही जर होळी खेळण्याचा विचार करत असाल तर काही विशिष्ट वस्तू व्यवस्थित सांभाळण्याची गरज आहे. होळी खेळत असताना खिशात नोटा ठेवू नका, कारण 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर होळीचा रंग लागल्यास बँक त्या नोटा स्वीकारणार नाही. होळीच्या रंगात रंगलेल्या नोटा फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातच जमा करता येणार आहेत. आरबीआयनं क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत ही गाइड लाइन जारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर याचे मॅसेजही व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर फिरत असलेले हे मॅसेजमध्ये तथ्य असल्याच्या वृत्ताला बँक अधिका-यांनी दुजोरा दिला आहे. आरबीआयकडून ही गाइडलाइन जारी करण्यात आली आहे. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर रंग किंवा पेनानं काही लिहिलं असल्यास त्या नोटा बँकेत जमा करण्यात येणार नाही, अशी माहिती दिल्लीतल्या सेक्टर 16 मधल्या पंजाब अँड सिंड बँकेचे चीफ मॅनेजर अनिल कुमार यांनी दिली आहे. तत्पूर्वी 500 आणि 1000च्या बंद करण्यात आलेल्या नोटांना रंग लागला असल्यास किंवा त्या नोटांवर पेनानं काही लिहिलं गेल्यास त्या बँकेत चालत होत्या. ब-याचदा सण असलेल्या घरात बनवलेल्या पक्वान्नच्या तेल नोटांना लागत होते. मात्र तरीही अशा नोटा बँकेत स्वीकारल्या जात होत्या. मात्र नोटाबंदीनंतर आरबीआयनं क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत नव्या नोटा स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. (लवकरच चलनात येणार दहा रुपयांची नवी नोट)नोटाबंदीपूर्वी 500 आणि 1000च्या नोटांवर काही जण स्वतःचं नाव लिहीत होते. नोटांवर पंचिंगही केलं जात होतं. त्याप्रमाणेच स्टेपल करत होते. मात्र या सर्व प्रकारावर आरबीआयनं पूर्णतः बंदी घातली आहे, अशी माहिती सिंडिकेट बँकेचे डीजीएम के. के. अग्रवाल यांनी दिली आहे. होळीच्या दिवशी नव्या नोटेवर रंग अथवा पेन चुकूनही चालल्यास त्या नोटा बँक स्वीकारणार नाही. अशा नोटा ग्राहकांना स्वतः जाऊन थेट आरबीआयमध्ये जमा कराव्या लागणार आहेत. सोशल मीडियावरचे प्रभावी माध्यम असलेले फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेले मॅसेजही खरे असल्याचं मत अग्रवाल यांनी मांडलं आहे.