न्यायालय आवारातून दुचाकीची चोरी
By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST
नाशिक : न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या एका पक्षकाराची दुचाकी चोरीला गेल्याची घटना सोमवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड येथील वसंत कॉलनीत राहणारे सुधीर मनोहर धगाटे (४७) हे न्यायालयीन कामकाजासाठी सोमवारी न्यायालयात आले होते़ त्यांनी आपली दुचाकी (सुझुकी ॲक्सेस - एमएच १५, ईडी-७५७४) न्यायालय आवारात पार्क करून कामासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली़ या प्रकरणी धगाटे यांनी दिलेल्या फि र्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ न्यायालय आवारातून दुचाकी चोरीस गेल्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी येणारे वकील व पक्षकारांच्या मनात धडकी भरली आहे़ (प्रतिनिधी)