आठ लाखांच्या मशिनची चोरी
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
नागपूर : खामल्यातील आनंद इंजिनिअरिंग कंपनीच्या कार्यालयात ठेवलेली आठ लाखांची मशिन चोरीला गेली. मनीष अशोककुमार त्रिपाठी (वय २७) यांच्या तक्रारीनुसार, ही मशिन रामप्रसाद खडवाल अलबर (रा. राजस्थान) आणि मजाहिद आलम (रा.प. बंगाल) यांनी ११ ते १२ फेब्रुवारीच्या रात्री चोरून नेली. गुरुवारी घटना उघडकीस आल्यानंतर त्रिपाठी यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
आठ लाखांच्या मशिनची चोरी
नागपूर : खामल्यातील आनंद इंजिनिअरिंग कंपनीच्या कार्यालयात ठेवलेली आठ लाखांची मशिन चोरीला गेली. मनीष अशोककुमार त्रिपाठी (वय २७) यांच्या तक्रारीनुसार, ही मशिन रामप्रसाद खडवाल अलबर (रा. राजस्थान) आणि मजाहिद आलम (रा.प. बंगाल) यांनी ११ ते १२ फेब्रुवारीच्या रात्री चोरून नेली. गुरुवारी घटना उघडकीस आल्यानंतर त्रिपाठी यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.----