शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रक्षेपकाचे होणार १००वे उड्डाण; श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रात तयारी, दोन उपग्रह अंतराळात एकमेकांना जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:46 IST

भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे असलेल्या स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी इस्रोने उपयोगात आणलेले दोन उपग्रह एकमेकांपासून विलग होऊन सोमवारी आपापल्या कक्षेत स्थिरावले असून, प्रारंभीचे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. 

श्रीहरिकोटा : जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल (जीएसएलव्ही) मोहिमेसंदर्भात आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून जानेवारीमध्ये प्रक्षेपकाचे १००वे प्रक्षेपण होणार आहे. प्रक्षेपकाने आपल्या ९९व्या उड्डाणात दोन उपग्रहांचे स्पेस डॉकिंगसाठी अवकाशात प्रक्षेपण केले, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. 

भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे असलेल्या स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी इस्रोने उपयोगात आणलेले दोन उपग्रह एकमेकांपासून विलग होऊन सोमवारी आपापल्या कक्षेत स्थिरावले असून, प्रारंभीचे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. 

दोन उपग्रहांना अंतराळात एकमेकांशी जोडण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी इस्रोने सोमवारी चाचणीतून मोठी कामगिरी बजावली आहे. या उपग्रहांची स्पेस डॉकिंग प्रक्रिया येत्या काही दिवसांनंतर म्हणजे ७ जानेवारीला पार पडू शकते. स्पेस डॉकिंग एक्सपिरिमेंटसाठी (स्पाडेक्स) हे दोन उपग्रह जोडले जाणार आहेत.

प्रगत संशोधनासाठी स्पेस डॉकिंग आवश्यक- इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, अंतराळ क्षेत्रातील प्रगत संशोधनासाठी स्पाडेक्स मोहीम अतिशय आवश्यक आहे. मानवाला अंतराळात घेऊन जाणे, अवकाश स्थानक बांधणे अशा भारताच्या आगामी प्रकल्पात स्पेस डॉकिंग हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.- पीएसएलव्ही सी-६० या प्रक्षेपकाने दोन महत्त्वाच्या उपग्रहांसह आणखी काही उपग्रह नेले होते. ते भूपृष्ठापासून ४७५ किमी उंचीवर नियोजित कक्षेत स्थिरावले. 

स्पेस डॉकिंगबाबत भारत होणार आत्मनिर्भरस्पेस डॉकिंग प्रयोगासाठी दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करणे ही प्रक्रिया देखील भारताने प्रथमच पार पाडली आहे. त्यासाठी एसडीएक्स०१ (चेझर), एसडीएक्स०२ हे दोन उपग्रह तयार करण्यात आले.

त्यांचे वजन प्रत्येकी २२० किलोचे असून, ते अनंत टेक्नॉलॉजिज लिमिटेड या कंपनीने इस्रोसाठी बनविले. या उपग्रहांची चाचणी एटीएलच्या प्रयोगशाळेत पार पाडल्या जातात. यामुळे स्पेस डॉकिंगबाबत भारत आत्मनिर्भर होइल.

श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून १०० वे प्रक्षेपण होण्यासाठी जानेवारीमध्ये नियोजित जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल मिशनसह महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी इस्रो तयारी करत आहे, असे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :isroइस्रो