शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला जग पाहू द्या; हायकोर्टाने ११ वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 08:00 IST

हायकोर्टाने ११ वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी नाकारली

जयपूर : मुलीच्या पोटातील भ्रूणाची वाढ पूर्ण झाली आहे. त्याच्या हृदयाचे ठोके पडत आहेत. त्यामुळे या बाळाला जग पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत येथील हायकोर्टाने मुलीची गर्भपाताची विनंती नुकतीच फेटाळून लावली. ही मुलगी केवळ ११ वर्षांची असून, बलात्कारानंतर तिला गर्भधारणा झाली होती. 

याचिका निकाली काढताना हायकोर्टाने म्हटले आहे की, मुलीला बाळाला जन्म द्यावाच लागेल. आता या मुलीला जयपूरमधील बालिकाश्रमात ठेवण्यात यावे. तिचे भरणपोषण आणि उपचारांची संपूर्ण व्यवस्था करण्यात यावी. बलात्कार पीडित असल्याने मुलीला योग्य नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. बाळाची नाळ, रक्त आणि इतर नमुने डीएनए तपासणीसाठी सुरक्षित ठेवून नंतर पोलिसांकडे सुपुर्द केले जावेत. 

या प्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश अनुप कुमार ढंड म्हणाले की, मुलीला ३१ आठवड्यांनंतर ती गर्भवती असल्याचे लक्षात आले आहे. भ्रूण ३१ आठवड्यांचा असल्याने वैद्यकीय मंडळाच्या मतानुसार गर्भपात करणे सुरक्षित ठरणार नाही. कायद्यानुसार या मुलीला गर्भवती होण्याचा अधिकार नाही; परंतु, तिच्या गर्भातील भ्रूण पूर्णपणे विकसित झाला आहे. त्यामुळे या मुलीला गर्भपातासाठी  परवानगी देता येणार नाही. (वृत्तसंस्था)

नेमके प्रकरण काय?या प्रकरणातील बलात्कार पीडित मुलगी ११ वर्षांची असून, तिचे वडील सध्या तुरुंगात आहेत. बलात्कारानंतर या मुलीला गर्भधारणा झाली. परंतु, गर्भातील भ्रूण ३१ आठवड्यांचा झाल्यानंतरच मुलीला गर्भधारणा झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिच्या घरच्यांनी पालनपोषण करण्यास कुणी नसल्याचे कारण देत हायकोर्टात गर्भपाताची परवानगी मागितली होती.

कोर्ट काय म्हणाले? राज्यघटनेच्या कलम २१ नुसार पूर्णपणे विकसित झालेल्या भ्रूणाला निरोगी आयुष्य जगण्याचा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. रुग्णालयाने मुलीच्या सुरक्षित प्रसूतीची व्यवस्था करावी. तिची ओळख गुप्त ठेवली जावी. आरोग्य आणि महिला बाल विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी मुलीच्या सुरक्षित प्रसूतीची व्यवस्था करावी. बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी मुलीचे संरक्षण आणि देखभाल करावी.  nप्रौढ होईपर्यंत मुलीला बालिकाश्रमात ठेवण्यात यावे. जन्मानंतर मूल बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात यावे. 

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीCourtन्यायालय