शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार विकतेय या खासगी बँकेतील भागीदारी, ८७० चा शेअर मिळणार ८३० रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 11:26 IST

Central Government, Axis Bank : केंद्र सरकार खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेतील आपली भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारच्या स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ द यूनिट ट्र्स्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून अ‍ॅक्सिस बँकेमधील १.५५ टक्के भागीदारी विकण्याची योजना आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकार खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेतील आपली भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारच्या स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ द यूनिट ट्र्स्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून अ‍ॅक्सिस बँकेमधील १.५५ टक्के भागीदारी विकण्याची योजना आहे. म्हणजेच ४.६५ कोटी शेअर विकण्याचा सरकारचा विचार आहे. शेअर बाजारांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

या विक्रीसह सरकार खासगी क्षेत्रातील या बँकेमधून आपली संपूर्ण भागीदारी काढून घेणार आहे. एसयूयूटीआयकडे सप्टेंबर २०२२ पर्यंत अॅक्सिस बँकेमध्ये १.५५ टक्के भागीदारी असलेले ४,६५,३४,९०३ शेअर होते. केंद्र सरकारला बाजार भावानुसार अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअरच्या विक्रीमधून सुमारे ४००० हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारने गतवर्षी मे महिन्यामध्ये एसयूयूटीआयच्या माध्यमातून  अ‍ॅक्सिस बँकेमधील आपली १.९५ टक्के भागीदारी सुमारे ४ हजार कोटी रुपयांना विकली होती. आता सरकार १०-११ नोव्हेंबर रोजी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून ८३०.६३ रुपये प्रति शेअरच्या किमान मूल्यामध्ये ४६.५ दशलक्ष शेअरची विक्री करणार आहे. एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ही ऑफर आजपासून सुरू होईल. तर किरकोळ गुंतवणुकदार हे दुसऱ्या दिवसापासून बोली लावू शकतील. 

खासगी क्षेत्रातील  अ‍ॅक्सिस बँकेने सप्टेंबर २०२२च्या तिमाहीमध्ये अंदाजापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. बँकेचा नफा तब्बल ७० टक्क्यांनी वाढून ५ हजार ३३० पर्यंत पोहोचला आहे. तर व्याजामधून मिळणारं उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढून १० हजार ३६० कोटी रुपये झाले आहे. निव्वळ व्याजातील फरक हा ३.९६ टक्के एवढा राहिला आहे.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBanking Sectorबँकिंग क्षेत्रStock Marketशेअर बाजार