शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदाप्रकरणी थरूर यांना नोटीस नाही

By admin | Updated: January 9, 2015 02:08 IST

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांना कुठलीही कायदेशीर नोटीस पाठविण्यात आलेली नाही,

दिल्ली पोलीस आयुक्तांची स्पष्टोक्ती : सर्व पुराव्यांचा तपास, सत्यता तपासली जात आहेनवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांना कुठलीही कायदेशीर नोटीस पाठविण्यात आलेली नाही, अशी स्पष्टोक्ती दिल्लीचे पोलीस आयुक्त बी़एस़ बस्सी यांनी गुरुवारी येथे दिली़थरूर यांनी पत्नीच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासात सहकार्य करावे, यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते़ या पार्श्वभूमीवर बस्सी यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली़ आम्ही थरूर यांना सुनंदाप्रकरणी औपचारिक कायदेशीर नोटीस पाठविलेली नाही़ तपासासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली जात आहे़ तपास अधिकाऱ्यांना माहिती गोळा करायची असून सर्व पुराव्यांचा तपास आणि त्याची सत्यता तपासली जात आहे, असे ते म्हणाले़ दिल्ली पोलिसांनी सुनंदा मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे़ गतवर्षी १७ जानेवारीला सुनंदा दक्षिण दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या़ शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)गुरुवयूर (केरळ): काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असतानाच, या प्रकरणावर प्रसिद्धीमाध्यमांना सामोरे जाण्याचे थरूर टाळत आहेत़ तूर्तास गुरुवयूर येथील आयुर्वेदिक केंद्रात ते उपचार घेत आहेत़थरूर यांच्या प्रतिक्रियेसाठी मीडियाने संबंधित आयुर्वेदिक केंद्राबाहेर ठाण मांडले आहे़ मात्र, गुरुवारी तरी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्याची शक्यता कमीच आहे़आयुर्वेदिक केंद्राचे अधिकारी पेरुमबयिल मान यांनी सांगितले की, थरूर यांचा १५ दिवसांचा कोर्स शुक्रवारी संपत आहे़ त्यामुळे गुरुवारी प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलण्याची शक्यता कमी आहे़केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक साजी कुरूप यांनी सांगितले की, सामान्यत: कोर्स पूर्ण होईपर्यंत केंद्रातील कुठल्याही रुग्णास आगंतुकांशी भेटण्याची वा त्यांच्याशी दीर्घ चर्चेची परवानगी दिली जात नाही़ कोर्स संपल्यानंतर त्यांना काय करायचे, हा निर्णय त्यांचा असेल़ ते उपचारादरम्यान पुस्तक लिहिण्यात मग्न आहेत, असेही त्यांनी सांगितले़