सुनंदाप्रकरणी थरूर यांची पुन्हा चौकशी
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची आज गुरुवारी विशेष तपास पथकाने(एसआयटी) दुसऱ्यांदा चौकशी केली़ गत चार आठवड्यात एसआयटीने दुसऱ्यांदा थरूर यांची याप्रकरणी चौकशी केली आहे़
सुनंदाप्रकरणी थरूर यांची पुन्हा चौकशी
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची आज गुरुवारी विशेष तपास पथकाने(एसआयटी) दुसऱ्यांदा चौकशी केली़ गत चार आठवड्यात एसआयटीने दुसऱ्यांदा थरूर यांची याप्रकरणी चौकशी केली आहे़दक्षिण दिल्लीच्या वसंतकुंजस्थित एसआयटी कार्यालयात थरूर यांची चौकशी करण्यात आली़ यापूर्वी १९ जानेवारीला त्यांना एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते़एका सूत्राने सांगितले की, आम्ही काही प्रमुख बिंदूंवर माहिती घेण्यासाठी त्यांना बोलवले होते़ या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आतापर्यंत १५ लोकांची चौकशी केली आहे़ यात थरूर, त्यांचे कर्मचारी आणि जवळच्या मित्रांचा समावेश आहे़ सुनंदा यांचा मुलगा शिव मेनन यालाही गत ५ फेबु्रवारीला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़ यावेळी शिव मेननला थरूर आणि त्यांची पत्नी सुनंदा यांच्यातील नातेसंबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले होते़१७ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलच्या एका खोलीत सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या़ त्या आधी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यातील कथित प्रेमसंबंधांवर सुनंदा यांनी टिष्ट्वटरवर आपला संताप व्यक्त केला होता़