ठाणे जिल्हा परिषदेच्या अधीक्षक अभियंत्याला लाच स्विकारतांना अटक
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
प्रलंबित प्रस्तावांच्या मंजूरीसाठी मागितली साडे तीन हजारांची लाच
ठाणे जिल्हा परिषदेच्या अधीक्षक अभियंत्याला लाच स्विकारतांना अटक
प्रलंबित प्रस्तावांच्या मंजूरीसाठी मागितली साडे तीन हजारांची लाचठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधीक्षक अभियंता संजय बाविस्कर यांना साडे तीन हजारांची लाच स्विकारतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या सात प्रस्तावांच्या तांत्रिक मंजूरीसाठी त्यांनी या लाचेची मागणी केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.या योजनेचे सातही प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे प्रलंबित असल्यामुळे अधीक्षक अभियंता बाविस्कर तसेच कनिष्ठ अभियंता सुरेश भोईर यांनी संबंधितांकडे साडे तीन हजारांच्या लाचेची मागणी केली. त्याबाबतची त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर दोघांनी मागणी केल्यानंतर या दोघांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास रचलेल्या सापळयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच बावीस्कर यांना ही लाच स्विकारतांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अंजली आंधळे या अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)---------------प्रतिनिधी - जितेंद्र कालेकर