शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ठाकरे, तर उपाध्यक्षपदी अहुजा

By admin | Updated: July 13, 2017 23:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा न्यायालयातील नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत कार्यकारिणीतील अकरापैकी पाच पदांची बुधवारी (दि़ १२) मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले़ त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष ॲड़ नितीन बाबूूराव ठाकरे यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळाली असून,उपाध्यक्षपदी ॲड. प्रकाश आहुजा, सचिवपदी ॲड़ जालिंदर ताडगे, सहसचिवपदी ॲड़ श्यामला दीक्षित, तर सहसचिव ॲड़ शरद गायधनी हे निवडून आले़ दरम्यान, उर्वरित सहा पदांची मतमोजणी गुरुवारी (दि़ १३) सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे़नाशिक बार असोसिएशनच्या कार्यकारिणीसाठी मंगळवारी (दि. ११) ८३़५६ टक्के मतदान झाले होते़ त्यामध्ये तीन हजार ४३ पैकी दोन हजार ५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता़ असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व महिला सहसचिव या पाच पदांच्या मतमोजणीस बुधवारी न्यायालयातील आयटी लायब्ररीत सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात झाली होती़ सर्वप्रथम अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करण्यात आला़ त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष ॲड. ठाकरे यांनी ॲड़ महेश आहेर यांच्यावर २१८ मतांनी पराभव केला़ उपाध्यक्षपदी ॲड़ प्रकाश अहुजा यांनी ॲड़ सुदाम पिंगळे यांचा ४५६ मतांनी, सचिवपदासाठी ॲड़ जालिंदर ताडगे यांनी ॲड. वैभव शेटे यांचा ८० मतांनी, सहसचिव पदासाठी ॲड. शरद गायधनी यांनी ॲड़ हेमंत गायकवाड यांचा १३७, तर सहसचिव (महिला) या पदासाठी ॲड़ श्यामला दीक्षित यांनी ॲड़ मंगला शेजवळ यांचा २४० मतांनी पराभव केला़ अध्यक्ष, सचिव व सहसचिव या पदासाठी फेरीनिहाय कमी-अधिक होणार्‍या मतांमुळे उमेदवारांची चलबिचल होत होती़ निकाल जाहीर होताच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला होता़--इन्फो--विजयी उमेदवारांनी मिळालेली मते--------------------------------------------------पद उमेदवाराचे नाव मिळालेली मते--------------------------------------------------अध्यक्षॲड. नितीन ठाकरे १०३७ॲड. महेश अहेर ८१९उपाध्यक्ष ॲड. प्रकाश अहुजा ११४५ॲड. सुदाम पिंगळे ६८९सचिव ॲड. जालिंदर ताडगे८९८ॲड. वैभव शेटे ८१८सहसचिवॲड. शरद गायधनी ११७६ॲड. हेमंत गायकवाड१०३९सहसचिव (महिला) ॲड. श्यामला दीक्षित९०४ॲड. मंगला शेजवळ ६६४----------------------------------------------------कोट--नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदावर असताना केलेल्या कामाची पावतीच वकिलांनी दिली आहे़ या संधीचे सोने करणार असून, पोलीस आयुक्तालयाकडून मिळालेल्या जागेवर मुख्यमंत्र्याना भेटून नवीन इमारतीचे काम, निधीची तरतूद यासाठी प्रथम प्राधान्य असणार आहे़ याबरोबरच वकिलांना काम करताना भेडसावणारे प्रश्न तसेच वकील भवनसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत़- ॲड़ नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार असोसिएशन, नाशिक़फोटो :- १२ पीएचजेएल ७१नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड़ नितीन ठाकरे हे निवडून आल्यानंतर जल्लोष करताना वकीलवर्ग व त्यांचे समर्थक़फोटो :- १) आर / फोटो / १२ ॲड़ प्रकाश अहुजा२) आर / फोटो / १२ ॲड़ जालिंदर ताडगे३) आर / फोटो / १२ ॲड़ शरद गायधनी४) आर / फोटो / १२ ॲड़ श्यामला दीक्षित या नावाने सेव्ह केले आहेत़