शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांची शहा-पवार यांच्यावर टीका

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी

कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी
-उद्धव ठाकरे यांचा शहा-पवारांना टोला
मुंबई: कुणाला स्वबळाची तर कुणाला सरकार पाडण्याची खुमखुमी आली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
मुंबईच्या नालेसफाईवरुन चिंता व्यक्त करणार्‍यांनी आधी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावं. तिथं सत्ता कोणाची आहे ते आपल्याला माहित नाही, असे उपरोधिकपणे म्हणत ठाकरे म्हणाले की, मुंबईत एका दिवसात ३०० मि.मी. पाऊस होऊन पाणी तुंबले तर अनेकांना नालेसफाईची आठवण झाली. मात्र दिल्लीत केवळ १०० मि.मी. पाऊस होऊन दिल्ली तुंबली. दिल्लीत नाले आहेत की नाही ते मला माहित नाही. परंतु आता काहींना नालेसफाईची आठवण कशी झाली नाही, असा टोला उद्धव यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना लगावला.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी महापालिका अधिकारी आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना उद्धव यांनी संबोधित केले. यावेळी पालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवक, विभागप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव आहे. त्याला विरोध करायला तो काही दाऊदचा उत्सव नाही. त्याला ब्रिटिशांनीही विरोध केला नाही. गणेशोत्सव भारतात नाही तर काय पाकिस्तानात साजरा होणार, हा मुर्दडांचा नाही तर जिवंत माणसांचा उत्सव आहे. तो दणक्यातच साजरा होणार, असा आदेश ठाकरे दिला.
कोणत्याही परिस्थित शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिली. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यातील आरोपींविरोधात अद्याप खटले सुरू आहेत. त्याविरोधात न्यायालयात जावे असे कोणाला वाटत नाही. पण, आपलेच लोक आपल्याच उत्सवांच्या विरोधात जातात. नमाजाच्या भोंग्याच्या विरोधात त्यांच्यातला कुणी न्यायालयात गेल्याचे दिसत नाही. मग आमच्याच उत्सवात विघ्न का आणता, असा उद्गीग्न सवाल करतानाच विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी गणेशोत्सव मंडळांना दिला. (विशेष प्रतिनिधी)
.....................................................
कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री
गणेशोत्सवासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अभ्यास करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले असून कायद्याची व्याप्ती वाढवण्यासंबंधी काही दुरुस्ती करण्याची गरज वाटली तर ते तशी शिफारस करणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. न्यायालयाचा सन्मान राखायचा परंतु उत्सव बंद करता येणार नाही याचेही भान राखायचे हे लक्षात घेऊन निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.