शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराने तीनपट वाढविला होता हप्ता

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

ठाणेदाराने तीनपट वाढविला होता हप्ता

ठाणेदाराने तीनपट वाढविला होता हप्ता

एसीबीने आपल्याच अधिकाऱ्यावर केली कारवाई : पोलीस विभाग हादरले

नागपूर :
भद्रावतीचे ठाणेदार अशोक साखरकर एपीआयसह लाच घेताना सापडल्याने पोलीस विभाग हादरला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक दिवसानंतर त्यांच्याच विभागात तैनात असलेल्या एखाद्या अधिकाऱ्याला याप्रकारे लाच घेताना पकडले. अवैध वाहतुकीच्या मासिक हप्त्याची रक्कम १० हजाराहून ३५ हजार रुपये केल्यामुळे साखरकरला तुरुंगात जाण्याची वेळ आली. रेती वाहतूक करणारा आकाश वानखेडे यांच्या तक्रारीवरून एसीबीने साखरकर आणि त्याचा सहायक निरीक्षक शंकर चौधरी याला २० हजार रुपयाची लाच घेतांना पकडले आहे.
साखरकर पूर्वी एसीबीमध्ये तैनात होते. सूत्रानुसार दीड वर्षांपूर्वी एसीबीमधून चंद्रपुरात बदली झाली होती. पहिले सिंदेवाही ठाण्यात तैनात होते. काही दिवसांपूर्वीच ते भद्रावती येथे बदलून आले होते. तक्रारकर्ता आकाश वानखेडे याचे तीन ते चार ट्रक आणि टिप्पर आहेत. तो पूर्वीच्या ठाणेदाराला रेती वाहतुकीच्या मोबदल्यात १० हजार रुपये देत होता. साखरकरने त्याला ३५ हजार रुपयांची मागणी केली. तीनपट अधिक रक्कम लाच देणे वानखेडेला शक्य नव्हते. साखरकर त्यापेक्षा कमी रक्कम घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे वानखेडेचा व्यापारही प्रभावित होऊ लागला होता. मासिक हप्ता न देऊ शकल्याने वानखेडेने वाहतूकही कमी केली होती.
५ जुलै रोजी साखरकरच्या आदेशानुसार एपीआय चौधरीने वानखेडेचे वडील आणि वाहन चालकाला अवैध वाहतूक करतांना पकडले. तेव्हापासून साखरकर ३५ हजार रुपयाच्या हप्त्यासाठी तगादा लावू लागला. त्याने १० जुलै रोजी वानखेडेकडून १० हजार रुपये घेतले. उर्वरित २० हजार रुपये देण्यासाठी तो दबाव टाकू लागला. वानखेडेने वाहन फायनान्सवर घेतले होते. त्याला मासिक हप्ते भरणे कठीण जात होते. यातच ३५ हजार रुपयाच्या लाचेमुळे तो आणखीनच त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याने २७ जुलै रोजी एसीबी अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे तक्रार केली. जैन यांनी डीव्हायएसपी किशोर सुपारे यांच्यावर जबाबदारी सोपविली. सुपारे यांनी शनिवारी सायंकाळी साखरकर आणि चौधरी यांना रंगेहात पकडले.