शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांची कराची, युरोपचा अहवाल : भारतविरोधी संघटनांचे केंद्र

By admin | Updated: February 18, 2017 04:51 IST

पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील

लंडन : पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील गटाने म्हटले आहे.इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने (आयसीजी) पाकिस्तानवरील अहवालात म्हटले की, लष्कर-ए-तय्यबा, जमात-उद-दावा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या भारत विरोधी संघटनांना मदरसे व धार्मिक संस्था चालवण्यासाठी सुरक्षा दले मदत करतात. पाकिस्तानमधील सर्वांत धोकादायक गट कराची येथून विविध कारवायांत सक्रिय भाग घेत आहेत. शियाविरोधी लष्कर-ए-झांगवी व भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे जवळचे संबंध आहेत. ब्रुसेल्स येथील या विचारगटाने म्हटले की, दशकानुदशकांचे दुर्लक्ष आणि ढिसाळ कायदा-सुव्यवस्था यामुळे कराचीचे रूपांतर प्रेशर कुकरमध्ये झाले आहे. जेव्हा जेव्हा भारत-पाकसंबंधांत किंवा काश्मिरात तणाव असतो तेव्हा तेव्हा हे गट शहरातील मध्यवर्ती भागांत सुरक्षित असतात. लष्कर किंवा जैश यासारख्या संघटना देशाच्या एका भागात मित्र आणि दुसऱ्या भागात शत्रूचे काम करतात, असे तर पाकचे सरकार म्हणू शकत नाही ना. सरकारचा छुपा पाठिंबा व कमालीची अनागोंदीची स्थिती, यामुळे जिहादी गटांचे चांगलेच फावले, असेही अहवालात म्हटले आहे.सूत्रांचा हवाला देत आयसीजीने म्हटले की, अनेक जिहादींचे सूत्रधार सप्टेंबर २०१३ मध्ये सैनिकी कारवाईच्या भीतीतून कराचीला पळून आले. मात्र, आता कारवाई होत नसल्याने कराचीतच स्थायिक झाले असावेत. आयसीजीने पाकच्या सेवानिवृत्त वरिष्ठ प्रांतीय अधिकाऱ्याचा हवाला  देऊन म्हटले की, पाक-भारत किंवा काश्मीरवरून तणाव वाढतो तेव्हा हे  गट शहराच्या मुख्य भागात सक्रिय  होतात. (वृत्तसंस्था) बेरोजगारीमुळे संघटनांचे फावते...कराचीतील पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देऊन आयसीजीने म्हटले की, आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेगळा असल्याचे बघण्याची सवय लागली आहे. आम्ही तसे करू शकत नाही. आम्ही त्या प्रश्नाकडे आमच्या परराष्ट्र धोरणातूनही बघायला हवे. या अहवालात असेही म्हटले आहे की जिहादींच्या बाजूने असलेले महत्वाचे मदरसे त्यांना हवे तसे वागत आहेत. बेरोजगारीमुळे वेगळे पडलेले युवक वा तरूण जिहादींच बनतात, असे समजणे योग्य नाही. उत्पन्नाचे साधन नसणाऱ्यांना ओढतात जाळ्यातचांगला पैसा मिळत असलेल्या कराचीतील जिहादी संघटनांबद्दल अहवालात माहिती आहे. जगण्याचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसलेल्यांना करातीचील जिहादी संघटना खास पुढाकार घेऊन आपल्यात ओढतात. त्यापैकी अनेकांना इतर पर्याय फारच थोडे उपलब्ध असतात त्यांना जिहाद हे काम मिळते, असे आयसीजीने म्हटले.