शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी अबु दुजाना ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:59 IST

अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याची आखणी करणारा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबु दुजाना आणि त्याचा साथीदार मंगळवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले.

श्रीनगर : अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याची आखणी करणारा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबु दुजाना आणि त्याचा साथीदार मंगळवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले.अबु दुजाना हा पाकिस्तानी नागरिक असून, तो २0१0 साली काश्मीरमध्ये आला आणि उत्तर काश्मीरमध्ये त्याने नेटवर्क उभारले. गेल्या वर्षी जुलैमध्ये लष्करी कारवाईत बुरहान वणी ठार झाल्यानंतर अबु दुजानाकडे संघटनेची सूत्रे होती. त्याच्या अटकेसाठी १५ लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. सुरक्षा दले गेले अनेक महिने त्याच्या शोधात होती. मध्यंतरी पळून जाताना तो स्वत:चा मोबाइल कारमध्ये विसरून गेला. तो सुरक्षा दलाच्या हातात लागल्यामुळे त्याची माहिती मिळवणे सुरू केले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर तो पत्नीला भेटण्यासाठी पुलवामा जिल्ह्याच्या हाकरीपोरा गावातील घरी आल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी त्या घराला घेरले. त्याला पहाटे साडेचार वाजता बाहेर येण्याचे आवाहन करण्यात आले. पण तो येत नव्हता. अखेर सकाळी साडेनऊ वाजता लष्कराने घरावर रॉकेट लाँचर डागले.