शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधूनच आले होते दहशतवादी

By admin | Updated: July 31, 2015 01:56 IST

गेल्या सोमवारी पंजाबच्या गुरुदासपूर येथे आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले होते आणि त्यांनीच हल्ला करण्यापूर्वी जम्मू-पठाणकोट रेल्वे मार्गावर बॉम्ब पेरून ठेवले होते

नवी दिल्ली : गेल्या सोमवारी पंजाबच्या गुरुदासपूर येथे आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले होते आणि त्यांनीच हल्ला करण्यापूर्वी जम्मू-पठाणकोट रेल्वे मार्गावर बॉम्ब पेरून ठेवले होते, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. सीमेपलीकडून होणारी ही घुसखोरी रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. राजनाथसिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळातच गुरुदासपूर हल्ल्यावर निवेदन केले. ते म्हणाले, पंजाब पोलिसांनी यशस्वी मोहीम राबवून या तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले; परंतु या दरम्यान होमगार्डचे तीन जवान, एक पोलीस अधीक्षक शहीद झाले, तसेच तीन नागरिक ठार, तर दहा नागरिक व सात पोलीस जखमी झाले. दहशतवाद्यांकडून तीन एके-४७ रायफल्स, १९ मॅगझिन्स आणि दोन जीपीएस हस्तगत करण्यात आले आहेत. काँग्रेस सदस्यांच्या गोंधळातच राजनाथसिंह पुढे म्हणाले, ‘भारतातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यास सरकार कटिबद्ध आहे. घुसखोरीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी उपाय केले जातील.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेसचे बेजबाबदार वर्तन -जेटलीराजनाथसिंह यांना गुरुदासपूरमधील दहशतवादी हल्ल्यावर निवेदन करण्यापासून रोखण्याची काँग्रेसची कृती बेजबाबदारपणाची आहे, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.सीमापार दहशतवादावर संसदेत निवेदन करण्यापासून राजनाथसिंह यांना रोखून काँग्रेसने देशाची प्रतिमा ‘विभक्त घर’ म्हणून सादर केली आहे, असे जेटली म्हणाले. याकूब मेमनच्या फाशीबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानांवरही त्यांनी आक्षेप घेतला. काँग्रेस नेत्यांनी केलेली बेजबाबदार वक्तव्ये ही चिंतेचा विषय आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या मुद्यावर पक्षाची भूमिका मांडावी, असे आवाहन जेटली यांनी केले.गुरुदासपूरचा हल्ला हा पाकिस्तान प्रायोजित असल्याचा आरोप त्यांनी केला. तथापि या हल्ल्यानंतरही पाकिस्तानशी वाटाघाटी सुरू राहणार किंवा काय याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. राजनाथसिंह हे निवेदन देत असताना काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ‘हे राजकारण नाही. दहशतवादी हल्ल्यावरील निवेदन आहे,’ असे सांगून उपसभापती पी. जे. कुरियन यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले; परंतु काँग्रेस सदस्य शांत झाले नाहीत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या. भारताचा आरोप पाकने फेटाळलाइस्लामाबाद- पंजाबमधील गुरुदासपूर हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानातून आल्याचा भारताचा आरोप पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर चौकशी न करताच पाकिस्तानकडे बोट दाखविणे हे योग्य नाही असे पाकने म्हटले आहे.गुरुदासपूर येथील हल्ल्याचा आम्हीही कडक शब्दात निषेध केला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काझी खलिलुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.