शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात मारले गेलेले दहशतवादी विदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 03:44 IST

उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.‘या दहशतवाद्यांजवळून जप्त केलेली शस्त्रे व अन्य साहित्यावरून ते विदेशी नागरिक आणि लष्कर- ए- तोयबाचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असे लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी सांगितले. दहशतवाद्यांसोबतच्या या चकमकीत शहीद झालेल्या दोन कमांडर्सना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.तथापि, हे पाचही दहशतवादी नुकतेच भारतात घुसले होते की, आधीपासूनच मुक्कामाला होते किंवा ते एखाद्या नव्या दहशतवादी गटाचे सदस्य होते काय, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे दुआ म्हणाले. या भागात आणखी किती दहशतवादी दडून बसलेले आहेत याचा शोध घेतला जात आहे. जैश- ए- मोहंमदचा या भागात फारसा प्रभाव असेल, असे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुपवाडाच्या झोनरेशी गावात शुक्रवारी सुरू झालेली चकमक शनिवारी संपली होती, ज्यात हे पाच दहशतवादी ठार आणि दोन जवान शहीद झाले होते.घुसखोरीत घट झाल्याचा दावामागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी काश्मिरात सीमेपलीकडून होणारी घुसखोरी कमी झाली आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठविणाऱ्या ठिकाणी शंभरपेक्षाही कमी दहशतवादी आहेत, असा दावा लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी केला.२०१५ मध्ये घुसखोरीच्या ६०० पेक्षा जास्त घटना घडल्या होत्या. आता त्यात घट झाली आहे. आता शंभरेक दहशतवादी सीमेपलीकडे घुसखोरीच्या तयारीत असू शकतात; पण ही संख्या गतवर्षीच्या मानाने कमीच आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)