शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जातीवाचक शिवीगाळाने शनी पेठमध्ये तणाव

By admin | Updated: February 22, 2016 02:14 IST

जळगाव : जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन तरुणावर हल्ला व त्यानंतर दोन गटात उसळलेल्या दंगलीमुळे शनी पेठ भागात तणावाचे वातावरण कायम आहे. यावेळी अधिकार्‍यांसह तब्बल शंभराच्यावर कर्मचार्‍यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दगडफेक करणार्‍यांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.

जळगाव : जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन तरुणावर हल्ला व त्यानंतर दोन गटात उसळलेल्या दंगलीमुळे शनी पेठ भागात तणावाचे वातावरण कायम आहे. यावेळी अधिकार्‍यांसह तब्बल शंभराच्यावर कर्मचार्‍यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दगडफेक करणार्‍यांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.
या दगडफेकीत पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्या दालनाजवळही काही जणांनी विटा मारुन फेकल्या होत्या. सहा महिन्यापूर्वीही राष्ट्रपुरुषाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनवर दगडफेकीची घटना घडली होती. त्यानंतर रविवारची ही दुसरी घटना आहे.
चव्हाणवर दहा ते बारा जणांना केला हल्ला
रणजित चव्हाण या तरुणावर लल्ला, शोएब, जाकीर, नासीर, अय्याज यांच्यासह दहा ते बारा जणांनी रात्री साडे आठ वाजता कमरेच्या प˜्याने मारहाण करुन डोक्यात लोखंडी रॉड मारला. हल्लेखोरांची नावे चव्हाण यानेच पोलिसांना सांगितली. दरम्यान, यावेळी काही तरुणांजवळ तलवारीही होत्या असे सांगण्यात आले.जातीवाचक शिवीगाळ का केली, त्याचा जाब विचारल्याने हा हल्ला झाल्याचे चव्हाण याचे म्हणणे असले तरी यामागे आणखी काही वेगळे कारण आहे का? याची पोलीस चौकशी करीत आहेत.
घरातून काढल्या सळई व दांडके
पोलीस स्टेशनच्या बाहेर दगडफेक व विटांचा मारा झाल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद लोकांच्या घरात घुसून झाडाझडती घेतली असता लोखंडी रॉड, सळई व लाकडी दांडके आढळून आली. पोलीस कारवाईच्या भीतीने बहुतांश जणांनी घराला कुलूप लावून पळ काढला होता. तर काही घराच्या गच्चीवर लपून बसले होते.
शनी पेठमध्ये छावणीचे स्वरुप
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनीपेठ परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, सहायक निरीक्षक संदीप पाटील, दीपक गंधाले, उपनिरीक्षक गजानन राठोड, पवन राठोड आदी अधिकार्‍यांवर पाईंटची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या दिमतीला अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले होते. शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी मागविण्यात आले होते.