शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांनी भरला मुंजेवाडी तलाव

By admin | Updated: October 5, 2016 00:22 IST

जलसंधारणास फायदा : जवळा गावाचा पाणी प्रश्न सुटला

जलसंधारणास फायदा : जवळा गावाचा पाणी प्रश्न सुटलाजामखेड : तालुक्यातील जवळा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला मुंजेवाडी तलाव दहा वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला. जलसंधारणचे कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा वर्षभराचा प्रश्न मिटला. यामुळे जवळेकरांनी आनंदोत्सव साजरा केला. गावकर्‍यांनी तलावाचे जलपूजन करून दरवर्षी तलाव भरण्याची प्रार्थना केली. जवळा गावातील नांदणी नदीचे पाच किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरण केले. तसेच अकरा बंधार्‍यांचे काम हाती घेतले असून पाच बंधारे पूर्ण झाले आहेत. तसेच कंपार्टमेंट बंडीग, नाला बंदिस्ते, सिमेंट नाले आदी कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत.पंधरा दिवसांपासून नान्नज व जवळा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाने जलसंधारण कामातून पाच टी. एम. सी. पाणी अडले आहे. पंधरा दिवसांपासून आजतागायत पडणार्‍या पावसाने जवळा जलमय झाले आहे. दहा वर्षांनंतर मुंजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गावाचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा वर्षभराचा प्रश्न मिटला. मुंजेवाडी तलावातील पाण्याचे जलपूजन ज्योती क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आजीनाथ हजारे,उपाध्यक्ष दशरथ हजारे ,भाजपा अल्पसख्यांक मोर्चा जिल्हा चिटनीस हबीब शेख, नान्नजचे माजी सरपंच सुनील हजारे, माजी उपसरपंच सतोंष मोहळकर, संजय बोराटे, शरद कळसकर आदींनी विधीपूर्वक केले. ..................................फोटो ०४जामखेड मुंजेवाडी तलावओळ: मुंजेवाडी (ता. जामखेड) तलावातील पाण्याचे जलपूजन ज्योती क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आजीनाथ हजारे,उपाध्यक्ष दशरथ हजारे ,भाजपा अल्पसख्यांक मोर्चा जिल्हा चिटनीस हबीब शेख, नान्नजचे माजी सरपंच सुनील हजारे, माजी उपसरपंच सतोंष मोहळकर, संजय बोराटे, शरद कळसकर आदींनी विधीपूर्वक केले.