शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

टेलिफोन बिल, हॉटेलिंग, विमानाचं तिकीट 1 जूनपासून महागणार

By admin | Updated: May 31, 2016 21:40 IST

केंद्र सरकारनं सर्व करपात्र सेवांवर 0.5 टक्के कृषी कल्याण सेस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 31-  मोबाईलवर जास्त वेळ बोलणं आणि हॉटेलिंग करणं आता महागात पडणार आहे. केंद्र सरकारनं सर्व करपात्र सेवांवर 0.5 टक्के कृषी कल्याण सेस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेस्टॉरंटचं बिल, विमानाचं तिकीट आणि टेलिफोन बिल महागणार आहे. कृषी कल्याण सेस उद्यापासून लागू होत असल्यामुळे सर्व्हिस टॅक्स 15 टक्क्यांवर जाणार आहे. कृषी कल्याण सेस लागू केल्यानंतर या वर्षी  ग्राहकांवर 20,600 कोटींचा बोजा पडणार असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 
1 जूनच्या आधी ज्या ग्राहकांचं बिल जनरेट झालं आहे, त्यांना कृषी कल्याण सेस लागू होणार नाही. मात्र ते बिल 1 जूननंतर भरल्यास त्यांना कृषी कल्याण सेस भरावा लागणार आहे. कृषी कल्याण सेस लागू झाल्यामुळे ग्राहकांना दिल्या जाणा-या सेवांवर आता व्हॅट आणि सेवा शुल्क व्यतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. कृषी कल्याण सेसमुळे सर्व्हिस टॅक्स महागणार असून, मूल्यवर्धित सेवांना हा कर स्वच्छ भारत सेसनुसारच लागू होणार आहे. 
केंद्र सरकारनं कृषी, शेतक-यांचं हितासाठी हा कृषी कल्याण सेस लागू करत असल्याचं अरुण जेटलींनी म्हणालेत. मात्र कृषी कल्याण सेसमधून 47 सेवांना वगळण्यात आलं आहे. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डनं रेल्वेचं तिकीट बुक केल्यास कृषी कल्याण सेस भरावा लागणार नाही. त्यामुळे आता रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडकीतून तिकीट बुक केल्यासही अतिरिक्त 30 रुपयांचं शुल्क भरावं लागणार नाही. आयआरसीटीसीवरून ऑनलाइन पद्धतीनं तिकीट बुक केल्यासही कृषी कल्याण सेस लागू होणार नाही. 2 लाखांहून अधिक किमतीचं सोनं खरेदी केल्यास 1 टक्क्याचा टीसीएस भरावा लागणार आहे.