शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

दूरसंचार घोटाळ्याचा मोदी सरकारला फास?

By admin | Updated: July 8, 2016 04:25 IST

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेवरून खाली खेचणारे दूरसंचार प्रकरण आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या गळ्याला फास लावत आहे.

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेवरून खाली खेचणारे दूरसंचार प्रकरण आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या गळ्याला फास लावत आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स, आयडिया, टाटा आणि एअरसेल कंपन्यांनी चार वर्षांत ४६,०४५.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न कमी दाखवून सरकारला कोट्यवधीची टोपी घातली आहे; तरीही सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. कंट्रोलर अ‍ॅण्ड आॅडिटर जनरल(सीएजी) यांच्या अहवालात हा खुलासा झाला की सरकारला या कंपन्यांकडून जवळपास १३ हजार ४८८ कोटी रुपये वसूल करायचे आहेत. परंतु त्या दिशेने काही कारवाई होत असल्याचे संकेत अद्याप मिळत नाहीत. ज्या सीएजीच्या अहवालाने काँग्रेस सरकारला भ्रष्ट ठरविले त्याच सीएजीची नजर आता नरेंद्र मोदी सरकारवर आहे. गुजरात पेट्रोलियमच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची लक्तरेही सीएजी अहवालामुळेच समोर आली. आता दूरसंचारचा क्रमांक आहे. सरकारच्या भूमिकेमुळे सरकारी तिजोरीचे जवळपास ४५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजले जाते.मोदी सरकारविरोधात संधीच्या शोधात असलेल्या काँग्रेसने या घोटाळ्याशी संबंधित सगळा दस्तावेज जाहीर केला आहे. तो करण्याचा उद्देश एवढाच आहे की जे मोदी सरकार प्रामाणिकपणाचे ढोल वाजवत आहे ते गळ्यापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला, शक्ती सिंह गोहील आणि आर. पी. एन. सिंह यांनी क्रमाक्रमाने हा दस्तावेज जाहीर करून सरकार सरकारी तिजोरीला भगदाडे पाडून आपल्या मर्जीतील उद्योगसमूहांना फायदा मिळवून द्यायचा कसा प्रयत्न करीत आहे हे सिद्ध केले. सरकारी तिजोरीचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी सरकारची कोणती योजना आहे अशी विचारणा काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.वसुली का थांबवली?- मोदी सरकार मोजक्या कंपन्यांशी हातमिळवणी करून सरकारी तिजोरीचे नुकसान करण्यास हातभार तर लावत नाही ना? असे जर नाही तर सीएजीने सांगितल्यानंतरही मोठ्या प्रमाणावरील वसुली थांबविली का जात आहे?- सरकार या कंपन्यांकडून पैसा वसूल का करू इच्छित नाही? काँग्रेसने मोदी सरकार हे मुद्दामच करीत आहे; कारण कायदा दुबळा व्हावा आणि या कंपन्यांना या प्रकरणातून सुटण्यासाठी रस्ता मिळावा, असा आरोप केला आहे.