शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

टेलिकॉम इंडस्ट्रीत 1 लाख नोक-यांवर येणार कु-हाड

By admin | Updated: February 15, 2017 15:19 IST

टेलिकॉम इंडस्ट्रीत आलेल्या विलीनीकरणाच्या लाटेमुळे जवळपास 25 हजार नोक-यांवर कु-हाड पडणार आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - टेलिकॉम इंडस्ट्रीत आलेल्या विलीनीकरणाच्या लाटेमुळे जवळपास 25 हजार नोक-यांवर कु-हाड पडणार आहे. दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे टेलिकॉम सेक्टर प्रभावित होऊन अनेकांवर नोक-या गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. एका कंपनीच्या एचआर हेडच्या मते, या एकत्रीकरणामुळे हेड ऑफिस आणि सर्कल(ऑफिस)मध्ये काम करणा-या अधिका-यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार कायम आहे. जवळपास 10 हजार ते 25 हजार नोकर कपात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून, त्यांची संख्या 1 लाखांच्याही घरात जाऊ शकते, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर जवळपास 3 लाखांहून अधिक लोक अवलंबून आहेत. मात्र कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे एक तृतीयांश लोकांना स्वतःची नोकरी गमावावी लागणार आहे. 2017 या वर्षात आयडिया आणि व्होडाफोननं एकत्रीकरण केलं आहे. तसेच एअरसेल आणि रिलायन्स कम्युनिकेशन(आर कॉम)ही विलीनीकरण केलं आहे.

दरम्यान, काही पैसे जमवण्यासाठी मी माझ्या मुलासोबत जाणारा विदेश दौरा रद्द केला आहे, असं एका अधिका-यानं सांगितलं आहे. एका रिपोर्टनुसार, आयडिया, व्होडाफोन, आर कॉम आणि एअरसेलमध्ये जवळपास 48 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. एकत्रीकरणामुळे कंपनीचे सर्कल प्रमुख, मनुष्यबळ विकास आणि आर्थिक टीम प्रभावित होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांचा महसूल 4 ते 4.5 टक्के कर्मचा-यांवर खर्च होतो. मात्र त्याचा खरा प्रभाव सेल्स आणि डिस्ट्रीब्युशनवर पडणार आहे. मोठ्या कंपन्यांचा 22 टक्के खर्च हा सेल्स आणि डिस्ट्रीब्युशनवर होतो, असं एका एचआरनं सांगितलं आहे.