तेलंगणा: दक्षिणेतील राज्यांमधील अतिरंजीत गोष्टी अधूनमधून आपल्या कानावर पडत असतात. बदलत्या काळानुसार भारतातील इतर राज्यांतील राजकारणाचा बाज बदलत असता तरी दक्षिणेतील राज्यांमध्ये व्यक्तीपूजेचे स्तोम अजूनही कायम असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. यावेळी निमित्त ठरले ते तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष श्रीकोंडा मधुसूदन चारी. त्यांच्या समर्थकांनी शनिवारी अरेपली गावात झालेल्या कार्यक्रमात चारी यांच्यावर दुग्धाभिषेक केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मधुसूदन चारी टीकेचे धनी ठरत आहेत. या व्हिडीओत मधुसूदन चारी हे खाली एका आसनावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्यावर समर्थकांकडून घागरीने दुग्धाभिषेक केला जात आहे. एक घागर संपल्यानंतर ते आपल्या समर्थकांना थांबण्याचा इशारा करतानाही व्हीडिओत दिसतात. या व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
विधानसभा अध्यक्षांवर कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक; सोशल मीडियावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:22 IST