शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे फाटकांवरील अपघात टाळणार ‘इस्रो’चे तंत्रज्ञान

By admin | Updated: June 26, 2017 01:16 IST

पहारेकरी नसलेल्या रेल्वे फाटकांवर रस्त्यावरील वाहने आणि भरधाव येणारी रेल्वगाडी यांच्यात टक्कर होऊन घडणारे भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पहारेकरी नसलेल्या रेल्वे फाटकांवर रस्त्यावरील वाहने आणि भरधाव येणारी रेल्वगाडी यांच्यात टक्कर होऊन घडणारे भीषण अपघात टाळण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) विकसित केलेले तंत्रज्ञान वापरण्याचे रेल्वेने ठरविले आहे.यासाठी ‘इस्रो’ने विकसित केलेली उपग्रहावर आधारित ‘इंटेग्रेटेड सर्किट चिप’ (आयसी चिप) रेल्वेच्या इंजिनात बसविली जाईल. या चीपमुळे रेल्वेगाडी फाटकाच्या जवळ येऊ लागली की, पहारेकरी नसला तरी, फाटकापाशी बसविलेला भोंगा आपोआप वाजू लागेल. यामुळे फाटकातून रेल्वेरुळ ओलांडू पाहणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना गाडी येत असल्याची पूर्वसूचना मिळेल.रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेगाडी फाटकापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असताना इंजिनातील या ‘आयसी चिप’मुळे फाटकावर भोंगा वाजू लागेल. गाडी जसजशी फाटकाच्या जवळ येईल तसा भोंग्याचा आवाज वाढत जाईल व गाडी फाटक ओलांडून पार झाली की भोंगा वाजणे बंद होईल या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, सुरुवातीस मुंबई आणि गुवाहाटी राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनांमध्ये अशा ‘आयसी चिप’ प्रायोगिक तत्त्वावर बसविल्या जातील. तसेच या गाड्यांच्या मार्गावर असलेल्या २० विनापहारेकरी  रेल्वे फाटकांवर या चिपमुळे वाजणारे भोंगेही बसविले जातील. टप्प्याटप्प्याने आणखी रेल्वेगाड्याही या तंत्रज्ञानाने सज्ज केल्या जातील.गाड्यांचा ठावठिकाणा कळेल-या चिप उपग्रहाशी संलग्न असल्याने संपूर्ण प्रवासात रेल्वेगाडीचा नेमका ठावठिकाणाही त्यामुळे अचूक कळू शकेल. सध्या ही माहिती मार्गावरील स्थानकांतील कर्मचाऱ्यांकडून गोळा केली जाते. नव्या तंत्रज्ञानामुळे एखादी गाडी अमूक वेळेला नेमकी कुठे आहे याची माहिती प्रवाशांना त्याच वेळी देणेही शक्य होईल. या चिपमुळे रेल्वेमार्गाच्या परिसरातील भागाचे ‘मॅपिंग’ करणेही शक्य होईल आणि अपघाताच्या वेळी गाडी नेमकी कुठे आहे व तेथील भूप्रदेश कसा आहे हेही समजू शकेल.देशभरात रेल्वेमार्गांवर पहारेकरी नसलेली सुमारे १०००० फाटके आहेत व एकूण रेल्वे अपघातांपैकी ४० टक्के अपघात अशा फाटकांवर होत असल्याने हा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे. यावर रेल्वे निरनिराळे उपाय शोधत असते. फाटक बंद करायचे म्हटले, तर तेथे रेल्वेमार्गावरून रस्त्याचा पूल बाधावा लागतो किंवा रेल्वेमार्गाखालून रस्ता न्यावा लागतो. हे काम खर्चिक आहे व सर्व ठिकाणी ते शक्य होतेच असेही नाही. गेल्या दोन वर्षांत अशी सुमार २४०० फाटके बंद केली गेली आहेत.