शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्र्यांवर संघाचा दबाव

By admin | Updated: September 3, 2015 22:16 IST

नक्षलग्रस्त भागाच्या विकासाची जबाबदारी गृहमंत्रालयावर आहे. देशातील नक्षलग्रस्त जिल्हे व ईशान्य भारतातील राज्यांच्या विकासाचा वेग गृहमंत्र्यांनी त्वरित वाढवला पाहिजे, असा थेट इशारा राजनाथसिंहांना

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीनक्षलग्रस्त भागाच्या विकासाची जबाबदारी गृहमंत्रालयावर आहे. देशातील नक्षलग्रस्त जिल्हे व ईशान्य भारतातील राज्यांच्या विकासाचा वेग गृहमंत्र्यांनी त्वरित वाढवला पाहिजे, असा थेट इशारा राजनाथसिंहांना रा.स्व. संघाच्या बैठकीत देण्यात आला. याला कोणीही अधिकृत दुजोरा देत नसले तरी विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती हाती आली आहे. सरकारच्या कामकाजावर संघ परिवार कशा प्रकारे नियंत्रण ठेवू इच्छितो, त्याचा एक प्रकारे हा बोलका पुरावाच आहे.रा.स्व. संघाच्या दिल्लीतील बैठकीचा गुरुवारी दुसरा दिवस होता. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा बैठकीत झाल्याचे समजले. मात्र, त्याचा तपशील सांगण्यास सूत्रांनी नकार दिला. संघाचे प्रवक्ते म्हणतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही केंद्र सरकारचा आॅडिटर नाही. सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचा संघाचा कोणताही हेतू नाही. देशात विविध घटना वर्षभर घडत असतात. लोकांना प्रत्यक्ष भेटून त्याच्या तपशिलांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी सेवाभारती, विद्याभारती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अ.भा. विद्यार्थी परिषद यासारख्या संघ परिवाराच्या १५ संघटना, देशाच्या कानाकोपऱ्यात वर्षभर हिंडत असतात. जनतेच्या समस्या, व्यथा, वेदना समजावून घेतात. त्यावर आधारित त्यांचे लेखी टिपण तयार होते. त्याचे केवळ आदान-प्रदान नव्हे, तर संघाच्या दिल्लीतील समन्वय बैठकीत त्यावर चर्चाही होत आहे. संघाच्या बैठकीत प्रमुख केंद्रीय मंत्री व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या दीर्घकाळ उपस्थितीने राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बैठकीचे गांभीर्यही त्यामुळेच वाढले आहे. बिहार निवडणूक, भू-संपादन कायद्याबाबत सरकारने अचानक घेतलेली माघार, इत्यादी विषयांबाबत बैठकीत नेमकी काय चर्चा झाली. संघाने कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या. सरकारने कोणती आश्वासने दिली, याविषयी मंत्री अथवा त्यांचे निकटवर्तीय बोलायला तयार नाहीत. लालकृष्ण अडवाणींच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय? संघ कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन आता नकोसे झाले आहे का? या विषयावरही संघाच्या प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रि या व्यक्त केलेली नाही.