दवर्लीचा संघ उपांत्य फेरीत दाखल
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
मडगाव : स्पोर्टिंग क्लब ऑफ दवर्लीच्या संघाने यारी प्रिमियर चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत चांदोर स्पोर्टस् क्लब संघाला 3-0 गोलांनी नमविले.
दवर्लीचा संघ उपांत्य फेरीत दाखल
मडगाव : स्पोर्टिंग क्लब ऑफ दवर्लीच्या संघाने यारी प्रिमियर चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत चांदोर स्पोर्टस् क्लब संघाला 3-0 गोलांनी नमविले. स्पर्धेचे आयोजन कुंकळ्ळी युनियन क्लबतर्फे कुंकळ्ळी येथील सरकारी शाळेच्या मैदानावर करण्यात आले आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रात स्पोर्टिंगच्या संघाकडून एक गोलाची आघाडी घेण्यात आली होती. यावेळी चांदोर क्लब संघाचा बचावप? जॉझेफ फर्नाडीसच्या हाताला चेंडू लागल्याने पंचानी स्पोर्टिंग संघाला पेनल्टी बहाल केली याचाच फायदा उठवून ब्रायन फुर्तादोने पेनल्टीवर गोल केला.दुसर्या सत्राच्या अवघ्या दुसर्याच मिनिटाला विन्संट कुलासोने दिलेल्या पासवर मार्क बॉर्जिसने दुसर्या गोलाची नोंद केली त्यानंतर 64 व्या मिनिटाला स्टेन्ली मिरांडाने विन्संटच्या पासवर तिसरा गोल केला. तसेच स्पोर्टिंग संघाकडून पॅक्सटॉन गोम्स व स्टेन्ली गोम्स यांनी संधी दवडल्या तर चांदोरकडून सुकूर फर्नाडीस, आयवन पिंटो व विकी फर्नाडीस यांचे प्रय} वाया गेले. आजचा सामना : बेताळभाटी स्पोर्टिंग क्लब विरूध्द फा. आग्नेल स्पोर्टस् क्लब पारोडा.