शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

भाजपासोबत बैठकीसाठी संघाकडे तूर्तास वेळ नाही

By admin | Updated: May 20, 2015 01:44 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तूर्तास दिल्लीला येऊ शकणार नसल्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कळविण्यात आले आहे.

मोदीविरोधी बंड थंड करण्याचा प्रयत्न : भागवतांची दिल्लीवारी लांबणीवरहरीश गुप्ता - नवी दिल्लीभाजपासोबत दिल्लीत बैठक घेण्यास रा. स्व. संघाकडे वेळ नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तूर्तास दिल्लीला येऊ शकणार नसल्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कळविण्यात आले आहे.संघाची संपूर्ण यंत्रणा येत्या दोन महिन्यांत देशभरातील स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये अतिशय व्यस्त आहे. अपवाद केवळ कृष्णन गोपाल आणि सुरेश सोनी हे दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा. ते दिल्लीतील झंडेवाला कार्यालयात कायम तळ ठोकून आहेत. ‘घर वापसी’ आणि अन्य मुद्यांवरून दंड थोपटणाऱ्या घटकांना शांत करण्यात आले आहे. भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि स्वदेशी जागरण मंच यासारख्या संघ परिवारातील अग्रणी संघटनांनी मोदी सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनाही उपस्थित केलेल्या मुद्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देत संयम राखण्यास सांगण्यात आले आहे. अशा मुद्यांवर मोदी सरकारविरुद्ध जाहीरपणे टीका नको, अशी समज देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर विहिंपलाही सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. मोदी सरकारने राममंदिर मुद्याला दिलेली स्थगिती देशहिताची असल्याचे या संघटनेला पटवून देण्यात आल्याकडे संघाने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधले. नाराज मंत्र्यांना शांत राहण्याचा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि अन्य काही मंत्र्यांनी मोदी सरकार आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनाही सभ्यपणे संयम राखण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती रा.स्व. संघाच्या सूत्रांनी मंगळवारी लोकमतला दिली.संसदेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात माझ्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी अशी परंपरा राहिलेली नाही, असे जाहीरपणे सांगत गडकरींनी थेट सरकारवर हल्ला केला होता. गडकरींना शांत राहण्याचा सल्ला देताना संघनेत्यांना सध्याच मांजराच्या गळ्यात घंटा बांधली जाऊ नये, असे वाटते. मोदी सरकार कमकुवत बनायला नको... च्कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार कमकुवत होईल असे काहीही केले जाऊनये, असे संघाच्या नेतृत्वाला वाटते. गेल्या वर्षभरात मोदी सरकारने केलेल्या कामाची संघ नेतृत्वाने सार्वजनिक आणि खासगीरीत्या मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. चंद्रगुप्त मौर्य नंतर मोदी हेच पहिले हिंदू शासक आहेत. त्यामुळे हे सरकार कमकुवत बनेल, असेही चुकूनही काही केले जाऊ नये. काही नाराजीच्या बाबी असतील तर त्या सोडविल्या जातील, असे संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले. अमित शहांबाबत नाराजीच च्भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीबदल संघात नाराजीबाबत कोणतीही शंका उरलेली नाही, मात्र बिहारमधील निवडणुकीपूर्वी पक्षनेतृत्वात बदल करणे शक्य नाही. दुसरी बाब म्हणजे चिंतेचे मुद्दे चर्चा करून सोडविले जाऊ शकतात. राजनाथसिंग यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांनी मंत्रिपद सोडण्याची भाषा करू नये, त्यातून योग्य संदेश दिला जाणार नाही, असे संघाच्या नेत्यांना वाटते. संघ परिवारातील संघटनांना इशाराच्मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांमध्ये अडसर आणू नका, असा इशारा नागपुरात जाहीररीत्या देत संघाचे संयुक्त सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघ परिवारातील संघटनांना खडे बोल सुनावले आहे. संघाने सर्व मंत्रालयातील चिंतेच्या मुद्यावर ७२ कलमी यादी केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवतानाच त्यापैकी ३० मुद्यांवर तातडीने कृती करण्याची गरज अधोरेखित केली आहे. सरकार योग्य मार्गावर असून सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करायला हवी. निवडक संघर्षापेक्षा प्रतिसादात्मक सहकार्यावर भर दिला जावा, असे संघाला वाटते. त्यामुळेच काही मंत्र्यांची नाराजी असतानाही संघाने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीला व्यापकरीत्या सहमती दर्शविल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.