शिक्षक परिषदेची जि.प.वर धडक
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
फोटो ओळी....ओडी कर्ज कपातीला विरोध दर्शविण्यासाठी जि.प.कार्यालयापुढे निदर्शने करताना शिक्षक समितीचे पदाधिकारीनिदर्शने : ओडी कर्जकपातीचा विरोधनागपूर : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या ओडी कर्जाची रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच मुख्यालयी राहण्यासाठी होत असलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल ...
शिक्षक परिषदेची जि.प.वर धडक
फोटो ओळी....ओडी कर्ज कपातीला विरोध दर्शविण्यासाठी जि.प.कार्यालयापुढे निदर्शने करताना शिक्षक समितीचे पदाधिकारीनिदर्शने : ओडी कर्जकपातीचा विरोधनागपूर : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या ओडी कर्जाची रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच मुख्यालयी राहण्यासाठी होत असलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. मागील ११ महिन्यापासून शिक्षकांच्या वेतनातून ओडी कर्जाची कपात केली जात आहे. शिक्षकांनी कर्जाची रक्कम स्वत: भरणा केल्याच्या पावत्या दाखविल्यानंतर कर्ज कपात केली जात आहे. परंतु कपात करण्यात आलेली रक्कम शिक्षकांच्या कर्ज खात्यावर जमा होत नसल्याने त्यांवरील कर्जाचे हप्ते व व्याज कायम आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जि.प.अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री आदींना या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली. परंतु यावर क ोणताही तोडगा अद्याप काढलेला नाही. दुसरीकडे शिक्षकांना मुख्यालयी राहण्यासाठी सक्ती केली जात आहे. या अन्यायाविरोधात मोर्चा काढण्यात आला. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळाने अध्यक्ष निशा सावरकर, उपमुख्य कार्यकारी विवेक बोंदरे यांना निवेदन दिले. सुरेश पाबळे, रामू गोतमारे, अनिल नासरे, दिनकर उरकांदे , विलास काळमेघ, राजेश बिरे, सतीश देवतळे, नंदकिशोर वंजारी आदींचा त्यात समावेश होता.(प्रतिनिधी)