शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

मद्यनिर्मितीऐवजी केवळ चहा उत्पादन

By admin | Updated: May 19, 2016 04:33 IST

मेघालयातील एका गावाने स्वत:मध्ये ऐतिहासिक बदल घडवत, आता ‘आदर्श’ गाव म्हणून लौकिक मिळविला आहे.

शिलाँग : एके काळी मद्यनिर्मितीसाठी आणि मद्यपींसाठी कुख्यात असलेल्या मेघालयातील एका गावाने स्वत:मध्ये ऐतिहासिक बदल घडवत, आता ‘आदर्श’ गाव म्हणून लौकिक मिळविला आहे. या गावाने मद्यनिर्मिती पूर्णपणे थांबवली असून, आता तेथे केवळ चहा उत्पादन केले जाते.मायलनगॉट असे या गावाचे नाव असून, ते राजधानी शिलाँगपासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. या गावात हा ऐतिहासिक बदल घडविण्यामागे एक माजी शिक्षक आणि आताचा ग्रामप्रधान डी. एल. नाँगस्पंग यांचे डोके आहे. या गावातील २0 शेतकऱ्यांनी चहा उत्पादकांची एक सोसायटी स्थापन केली. त्यातील सहकार चळवळ राबवून गावाचे रूपांतर ‘आदर्श’ गावात केले. हे सर्व जण ५0 हेक्टर जमिनीवर दरवर्षी सेंद्रिय चहापत्तीचे वर्षाला ३ हजार किलोग्रॅम इतके उत्पन्न काढतात. आता तर ते गेल्या दोन वर्षांपासून आॅस्ट्रेलियाला चहाची निर्यात करीत आहेत.दहा १0 वर्षांपूर्वी हे गाव मद्यनिर्मिती आणि मद्यपींसाठी कुख्यात होते. स्थानिक महिला विशिष्ट प्रकारची ‘पायरसी’ नावाची दारू तयार करीत असत. आता त्याच महिला वेगवेगळ्या स्वादाच्या चहाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी त्याला ‘डरलाँग’ असे नाव दिले आहे. स्थानिक भाषेत ‘डरलाँग’चा अर्थ आहे ‘स्वप्न सत्यात उतरले.’ ४६ वर्षीय मोर्ताबान उमेसाँग ही महिला त्यापैकी एक आहे. उमेसाँग म्हणाल्या की, ‘मद्यपी रस्त्यावर गोंधळ घालत फिरत असताना आम्ही तरुण असताना मद्यपींची प्रचंड भीती वाटायची.’ गुन्हे कमी झालेचहाच्या उत्पादनाला प्रारंभी आदिवासी विकास मंत्रालयाने अर्थसाह्य केले. २00३ साली चहाची रोपे लावण्यात आली. त्यानंतर, चार वर्षांनी चहा उत्पादन सुरू झाले. नंतर येथे चहाच्या पानांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’ या संस्थेचे साह्य मिळाले.या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गावाचे रूपांतर मद्यउत्पादक ते चहा उत्पादक असे झाले असून, हा फारच महत्त्वाचा बदल आहे. मद्यामुळे कुटुंबात आणि गावात होणारी भांडणे, तसेच अन्य गुन्हे यांच्या प्रमाणात या काही वर्षात मोठी घट झाली आहे.