शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

तवा? तवाचं तवा! रात गई बात गई!

By admin | Updated: September 23, 2014 00:33 IST

पृथ्वीबाबा, तुमचा ह्या काय नाटकं चाल्ला आसा! आजवर तुमी म्हागल्या आकडेवारीवर आमाक नाचवित व्हता आन् आमी बी दरवेशाच्या आस्वलागत नाचीत हुतो.

शरदआण्णा : पृथ्वीबाबा, तुमचा ह्या काय नाटकं चाल्ला आसा! आजवर तुमी म्हागल्या आकडेवारीवर आमाक नाचवित व्हता आन् आमी बी दरवेशाच्या आस्वलागत नाचीत हुतो. त्या तुमी आता इसरतयं! याला जेंटलमनचो पॉलिटिक्स म्हनत नायं. आसा करान तर आगाडी व्हनार कशी? पृथ्वीबाबा : शरदआन्ना तुमची उमर माह्या अपेक्षा दुगनी राजकारणात तुमची इनिंग माझ्या वया यवडी आता तुमच्या सारखा मानूस आशा गोष्टी कराया लागला तर राजकारन होऊचा कसा? राजकारनात कालचं आज इसराचं असतं. आन् तुमी तर पार धा-पंदरा वर्षांपूर्वीच बोली ऱ्हायनात. तुमच्या सारखा मुरब्बी, राजकारणी आसा पोरकट वार्ता कराया लागला तर आमच्या सारख्या नव्या भिडू-पाडूनी कराचो काय? माका तर काय उमजीत नाय!छगनमामा : आमच्या सायबाचो उमर काढाची गरज नाय! २००५ला काय झालो? तुमच्या पेक्षा आमचो आमदार जास्त निवडून इलं व्हत की नाय? तरी बी आमच्या सायबाला पंजाक चिफ मिनीस्टरची दिलो की नाय? खरा खरा सांगाचो!माणिककाका : मामाश्री मी तुमाकं समजावतयं तुमी काय, दामाजी पंतावानी ती चीफमिनिस्टरशी आमाका मोफत दिली नाय, त्याबदल्यात काँग्रेसच्या वाट्याचो दोन मंत्रीपदे तुमी पदरात पाडून घेतलो की नाय? तुमीच खरा-खरा सांगाचो. माका समदा इतिहास माहिती आसा. आमचो बाबो त्या टायमाला दिल्लीक व्हता! त्याका काय इचारतय? त्या बिचाऱ्याक काय म्हायती नसा! त्याचो फायदो उपटाक बगू नका.छगनमामा : जल्ला मेला, या व्हराड्याचा लक्षान! नुक्को तिथं पचकतयं! पयले बुडाची खूर्ची सांभाळाचो, पोराकं तिकीट मिळवून द्याचो सोडून म्होट्याच्या मोट्या गप्पाक कशाक तोंड खूपसतयं खरा की नायं!पृथ्वीबाबा : तू तुझो मतदारसंघ सांभाळ रे! खासदारकीत तुका त्या नाशिकवाल्यांनी पार भुईसपाट केलो. आता येवल्याचो शिट सांभाळ नायतर तुझ्यावर परिषदेत जायची पाळी येऊचो तू कशाक म्होट्याच्या राजकारनाक उगाच बेटकुळी काडून दाखवतयं?शरदआण्णा : जल्ला मेला तुमचा लक्षानं, म्होटी-म्होटी मानसं बोलत असताना तुमी कशाक तोंड घालतयं? आमचा आमी बोलू ऱ्हायलो तुमी तुमचो मैदान सांबाळाना! हां तर पृथ्वीबाबा २००९ला आपला फारम्युला कोन्चो व्हतो? लोकसभा आन् विधानसभा निवडणुकीतील व्होटींग आन् जिंकलेल्या जागा आता तोच क्रायटेरिया लाऊचो आन् आगाडी करून टाकाचो! तुमचो दोन खासदार आमचो पाच खासदार. म्हन्जे ह्या टायमाक आमचो १७७ आन् तुमचो १११ खरा की नाय! आसतय काय त्याच्या मधी? पृथ्वीबाबा : त्या टायमाची गोट येगळी, या टायमाची येगळी. या टायमाला मोदी लाट आसतयं. मनसेचा जोर आसतयं, म्हायुती आसतयं या समदा बघाक गेलो तर तुमाक ११४ आन आमाक १७४ याच समीकरन ओ.के. आसा! पटतयं तर हा म्हनुचो नायतर च्या-पानी यायच्या आत माघारी जाऊचो!शरदआण्णा : चलो रे अपनी टोली! आमी वॉक आऊट करतयं (सगळे निघून जातात)माणिक काका : चल्ला रे भो! आता त्यांच्या वाटेच्या वाचलेल्या च्या-पान्यात आन नाश्ट्यात आपला येक येक्स्ट्रॉ राऊंड व्हनारं रे भो! घरी जाऊन जेवाची गरजच नाय भो!पृथ्वीबाबा : ये ठाकऱ्या! इथं आमाला आमच्या लाल दिव्याची पडली आन् तू नाश्टा पान्याच काय घेऊन बसला? गप्प बस. तर मंडळी या घड्याळजींनी वाकआऊट केल्यानं आता आपल्या पार्टीचो २८८ कॅन्डीडेट उबे ऱ्हानार आमी सोबोळावर लडनार आन् भौमत मिळविनार, आन् मीच पुना शी.यम. व्हनार!अहमदभाई (एन्ट्री करत) : बाब्या जरा गप्प बसाचो काय घेतयं? मी या म्हारानीचो मेसेज आनलयं. त्या घड्याळजीक १४४ आन आमाक १४४ हा फारम्युला घोषीत कराचो आन् कामाक लागाचो आता मचमच बंद कराचो पृथ्वीबाबा : ह्याच कराचा व्हता तर इतकं दिवसं आमचो कठपुतळी केलो कित्याक?अहमदभाई :तुमाक कठपुतळी कराचो जरुरच आसतयं कुठे? तुमी खानदानी कठपुतळी आसतयं! जावा कामाच लागाचो!- खिल्लारी