शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘तत्त्वशून्य’ ‘गोपूमामा’चा भाच्याने केला धिक्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:13 IST

आयुष्यभर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांशी बांधिलकी सांगणा-या गोपाळकृष्ण गांधी यांनी घराणेशाहीचे राजकारण रुजविणा-या काँग्रेसतर्फे

नवी दिल्ली : आयुष्यभर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांशी बांधिलकी सांगणा-या गोपाळकृष्ण गांधी यांनी घराणेशाहीचे राजकारण रुजविणा-या काँग्रेसतर्फे उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची उमेदवारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे भाचे श्रीकृष्ण (क्रिश) कुलकर्णी यांनी आपल्या ‘गोपूमामा’चा जाहीर धिक्कार केला आहे.गोपाळकृष्ण गांधी यांना उद्देशून इंग्रजीत लिहिलेले खुले पत्र कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर टाकले आहे. या पदासाठी उमेदवारी मिळाल्याने एकीकडे आनंद झाला, पण दुसरीकडे तत्त्वनिष्ठ ‘गोपूमामा’ने घेतलेल्या या निर्णयाने मन पार हताश झाले, असे नमूद करून, ‘एक सामान्य नागरिक’ या नात्याने कुलकर्णी यांनी भावना पत्रात मांडल्या आहेत.‘गोपूमामा’ला उद्देशून भाचा लिहितो, आपण दोघेही ज्यांचे रक्ताचे वारस आहोत, ते महात्मा गांधी व डॉ. भीमराव आंबेडकर हे निर्भीड आणि निरलस नेते होते. कोणालाही जन्माने कोणताही हक्क मिळण्यास या दोघांचा ठाम विरोध होता.‘गोपूमामा तू आयुष्यभर या दोघांच्या तत्त्वज्ञानाशी बांधिलकी सांगितलीस. त्यामुळे या तत्त्वांशी कोणतेही सोयरसुतक नसलेल्या काँग्रेसतर्फे तू उमेदवारी स्वीकारावीस, याने मन विदीर्ण झाले. घराणेबाज काँग्रेस नेत्यांसोबत बसून उमेदवारी अर्ज दाखल करतानाची तुझी छायाचित्रे टीव्हीवर पाहून खंत वाटली. मामा. त्या एका कृतीने तू आयुष्यभर निष्ठने पाळलेल्या तत्त्वांची पार चिरफाड केलीस!’