शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सायरस मिस्त्रींचे आरोप टाटांनी फेटाळले

By admin | Updated: October 28, 2016 04:59 IST

टाटा सन्सचे पदच्यूत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी केलेले आरोप रतन टाटा यांच्या वतीने फेटाळून लावण्यात आले आहेत. टाटा यांचा मागच्या दाराने समूहाचा ताबा मिळविण्याचा

नवी दिल्ली : टाटा सन्सचे पदच्यूत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी केलेले आरोप रतन टाटा यांच्या वतीने फेटाळून लावण्यात आले आहेत. टाटा यांचा मागच्या दाराने समूहाचा ताबा मिळविण्याचा कोणताही हेतू नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. न्यायालय हा वाद सोडविण्याचे अंतिम स्थान आहे, असेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले.टाटा समूहातर्फे अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, मी वादविवादात पडू इच्छित नाही. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळत असते, हे आपल्याला न्यूटनने शिकविले आहे. कोणीही आरोपांची राळ उडवू नये. शहाणपणाचे दर्शन घडविणे ही काळाची गरज आहे. शहाणपण हरवते आणि त्याची जागा आक्रमकता घेते, तेव्हा दुर्दैवाने न्यायालये हाच पर्याय उरतो. टाटा यांना चेअरमनपद सोडण्याचे कोणतेही बंधन नव्हते. तरीही त्यांनी स्वत:च ते सोडले. मानद चेअरमन म्हणून हक्क असतानाही संचालक मंडळांच्या एकाही बैठकीला हजर नव्हते. आता त्यांनी पद स्वीकारले असले तरी ते हंगामी आहे. मागच्या दाराने उद्योग समूहाची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवालही सिंघवी यांनी केला. सायरस मिस्त्री यांना पदच्यूत करण्याच्या निर्णयाचे सिंघवी यांनी समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)त्यांनी समूहाची प्रतिमा मलीन केलीआपल्याला अधिकारच नव्हते, हा मिस्त्री यांचा दावा टाटा सन्सने निवेदनाद्वारे फेटाळला आहे. त्यात म्हटले की, कार्यकारी चेअरमन या नात्याने मिस्त्री यांना सर्व अधिकार होते. अधिकार नसल्याचा आरोप त्यांनी पदावरून हटविल्यानंतरच केला. माजी चेअरमननी (रतन टाटा) दशकभराच्या काळात घेतलेल्या निर्णयांवरही पदावरून गेल्यानंतरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. हा प्रकार दुर्दैवी आहे. मिस्त्री यांनी समूहाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार माफीयोग्य नाही. अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, जेव्हा नऊ शहाणे-सुरते स्त्री-पुरुष एका व्यक्तीबाबत अविश्वास व्यक्त करतात, तेव्हा त्यामागे काही तरी कारणमीमांसा असते, हे लक्षात घेतले पाहिजे.