शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टाटांच्या "ताज" हॉटेलचा होणार ई-लिलाव

By admin | Updated: April 20, 2017 17:13 IST

दिल्लीतल्या 11 मजल्याच्या आलिशान पंचतारांकित ताज मानसिंग हॉटेलच्या ई-लिलावाला सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - दिल्लीतल्या 11 मजल्याच्या आलिशान पंचतारांकित ताज मानसिंग हॉटेलच्या ई-लिलावाला सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. लिलावात टाटा ग्रुपला यश न मिळाल्यास त्यांना हॉटेल खाली करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयानं नवी दिल्ली महापालिकेला (एनडीएमसी) सांगितले आहे. याआधी एनडीएमसीने ताज मानसिंगच्या ई-लिलावाची सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडला (IHCL) याबाबत सूचना केली आहे. तुम्हाला यासंदर्भात काहीही आक्षेप असल्यास एका आठवड्यात उत्तर दाखल करा, असंही सर्वोच्च न्यायालय म्हणाले आहे. 12 जानेवारी 2017ला सर्वोच्च न्यायालयानं एनडीएमसीला टाटा ग्रुपचं लीज न वाढवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची सूचना केली होती. सर्वोच्च न्यायालयानं एनडीएमसीने या प्रकरणात योग्य कारवाई न केल्याचा ठपका ठेवला होता. एनडीएमसीने सहा महिन्यांत निर्णय घ्यावा आणि कोर्टात त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असंही न्यायालयानं बजावलं आहे. मात्र, हॉटेलच्या लिलावादरम्यान टाटा ग्रुपलाच पहिलं प्राधान्य देण्यात यावं, असंही न्यायालय म्हणालं आहे.टाटा ग्रुप लिलावात ठरलेली रक्कम देऊ न शकल्यास मोठी बोली लागू शकते, असेही न्यायालयानं स्पष्ट केले. याआधी टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने लिलावाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ती याचिका 27 ऑक्टोबरला दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून नवी दिल्ली महापालिकेला हॉटेलच्या लिलावाला मंजुरी दिली. मात्र, टाटा ग्रुपने सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानं एनडीएमसीच्या बाजूने निर्णय दिलाय. टाटा ग्रुपचं ताज मानसिंग हे हॉटेल 1976 मध्ये आयएचसीएलला 33 वर्षांसाठी लीजवर दिले होते. मूळ संपत्ती ही एनडीएमसीच्या मालकीची आहे. मात्र, 2011 मध्ये लीज संपल्यानंतरही टाटा ग्रुपने वेगवेगळ्या आधारावर लीजचा विस्तार करून व्यावसाय सुरू ठेवला.