शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

अवकाश बाजारपेठेतील लकाकता तारा इस्रो

By admin | Updated: September 30, 2015 03:03 IST

‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ या उपग्रह मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतानं आंतरराष्ट्रीय अवकाश बाजारपेठेत आपलं नाणं खणखणीत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं.

भारताने अवकाश बाजारपेठेत स्वत:चा ‘ब्रॅण्ड’ ठळकपणे उभारण्यात यश मिळवलंय. स्वत:च्या दूरसंचार प्रसारण, हवामान, शिक्षण, शेती यासारख्या क्षेत्रांच्या विकासासाठी विविध उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या प्रक्षेपित करून अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानातही चांगलीच कामगिरी बजावली आहे. शिवाय आता इतर देशांचे उपग्रहही प्रक्षेपित करण्याची कामगिरी इस्रो बजावत आहे. त्यामुळेच नासालाही इस्रोच्या कामगिरीकडे अवकाश बाजारपेठेतील लकाकता तारा म्हणून पाहावं लागत आहे... इस्रोच्या याच कामगिरीविषयी...-------------भारताच्या पहिल्यावहिल्या खगोल अभ्यास वेधशाळेच्या अर्थातच ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ या उपग्रह मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतानं आंतरराष्ट्रीय अवकाश बाजारपेठेत आपलं नाणं खणखणीत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं. जगभरातच ब्रह्मांडामधील अलौकिक वाटणाऱ्या अवकाशस्थ गोष्टींचा वेध घेण्याची एक छुपी स्पर्धा सध्या सुरू आहे. भारतानं ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ मोहिमेच्या यशानंतर अशा मोहिमा यशस्वी करणाऱ्या अवघ्या सहा देशांच्या यादीत स्वत:चा समावेश करून घेतला.भारतामध्ये मूलभूत संशोधन फारसं होत नसल्याची तक्रार असली आणि खगोलशास्त्राबाबत जरी ती खरी असली तरी ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’मुळे खगोलीय संशोधनातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. पर्यायानं खगोल संशोधन आणखी पुढे सरकेल. ही खगोलीय वेधशाळा अवकाशात सोडण्यासह एकेकाळी भारतावर क्रायोजेनिक तंत्रज्ञानाबाबत निर्बंध लादणाऱ्या अमेरिकेचेही चार उपग्रह इस्त्रोनं प्रथमच अवकाशात सोडले. या प्रक्षेपणामुळे परकीय चलनसाठ्यातही भर पडणार आहे. अर्थात ‘मिनी हबल’ मात्र ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ नाही, कारण या दुर्बिणीची क्षमता नक्कीच जास्त आहे. १७८ कोटी रुपये खर्च आणि वैज्ञानिकांचे दहा वर्षांचे परिश्रम यशस्वी ठरले ही नक्कीच आनंदाची बाब आहे. सर्वसामान्य माणसांना मोहीम यशस्वी झाली म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय फरक पडणार हे बरेचदा समजून येत नाही.साधं उदाहरण प्रसारण पर्याय आणि दूरसंचार क्षेत्राचं आहे. आज जगातील हजारो उपग्रह पृथ्वीसभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. परंतु त्यांचे सिग्नल्स आपल्याला विविध टीव्ही चॅनेल्स, डीटीएच, इंटरनेट, मोबाइल (टू जी, थ्री जी आणि फोर जी) सेवा पुरवताहेत. शिक्षण घरबसल्या मिळण्यासाठी ‘एज्युसॅट’सारखे उपग्रह विद्यापीठ आणि महाविद्यालयांना उपयुक्त ठरत आहेत. हवामानाची अचूक माहिती ओशनसॅट यासारखे अनेक हवामानविषयक उपग्रह उपलब्ध करून देत आहेत. म्हणजे आता अवकाशात अनेक चालू आणि कालांतराने निकामी झालेल्या उपग्रहांचा अवकाशीय कचरा तयार झाला असल्याची भीती अनेकांना वाटते. ती खरी आहे म्हणूनच आता योग्य जागी उपग्रह पोहोचवून त्याद्वारे माहिती शेअर करण्याचा ट्रेंड मार्केटमध्ये रूजू होेतोय. त्यामुळे ‘स्ट्रॅटेजिक’ नॉलेज बेस्ड भागीदारी तत्त्वाद्वारे जगातील मोठमोठ्या अवकाश संस्था एकत्रित येऊन संयुक्त मोहिमा आखताना आणि इन्फ्रास्ट्रक्चर शेअर करताना दिसतात. ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ हादेखील या धोरणाचा दशावतार आहे. विश्वाचं गूढ उकलण्याची समस्त मानव जातीला घाई झालेली आहे. परंतु सात आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणे आतापर्यंत काम होत होतं. याउलट आता विविध वेधशाळांनी कामाचं वाटप करून घेत एकत्रित वाटचाल करण्यात येऊ लागली. आता भारतही यात ताठ मानेनं सहभागी होऊ शकेल. अवकाशातील क्ष-किरणांचा स्रोत, ताऱ्यांची जन्मस्थानं, कृष्णविवरं, न्यूट्रॉन तारे इत्यादींचा शोध आता सर्व तरंगलांबीत खगोल निरीक्षण शक्य असलेल्या ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’मार्फत करून एक संकलित चित्र निर्माण होऊ शकेल. प्रथमच स्वत:च्या क्ष-किरण आणि अतिनील किरण दुर्बिणीतून माहिती मिळेल. त्यामुळे भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ मोहिमेचं यश अभिनंदनीय आणि उत्साहवर्धक नक्कीच आहे. (लेखक विज्ञान पत्रकार आहेत.)--------------------------अपयशाच्या७ यशाची मंगळ मोहीम पहिल्याच टप्प्यात यशस्वी करून आणि त्यानंतरचे प्रत्येक प्रक्षेपणात यशाचं नवं मंडळ पार करून भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचं आता जगभरातील दिग्गज अंतराळ संशोधन संस्थांच्या ध्यानी आलं असेलच. कोणत्याही विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान भारत आता यशस्वीपणे वापरत आहे. पण या साऱ्या यशामागे अपयशाच्या सात पायऱ्या इस्रोला चढाव्या लागल्या आहेत. काही वेळा उड्डाण घेतानाच तर काही वेळा एखादा उपग्रह अंतराळात नेऊन पोहोचवण्यात अपयशी ठरलो आहोत. -------------१० आॅगस्ट १९७९ रोजी रोहिणी तंत्रज्ञान घेऊन जाणारे एसएलव्ही-३ हे पहिले प्रायोगिक प्रक्षेपण यशस्वी झाले पण नंतर उपग्रह कक्षेत स्थिर केले जाऊ शकले नाही.---------आठ वर्षांनंतर २४ मार्च १९८७ रोजी स्रॉस-१ हा उपग्रह घेऊन जाणारे एएसएलव्ही झेपावले पण हाही उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थिरावू शकला नाही.------------एका वर्षानंतर १३ जुलै १९८८ रोजी स्रॉस-२ हा उपग्रह घेऊन एएसएलव्ही झेपावले. पण पुन्हा तेच अपयश पदरी पडले.-------------पाच वर्षांनी २० सप्टेंबर १९९३ रोजी आयआरएस-१ई हा उपग्रह सोबत घेत पीएसएलव्हीने झेप घेतली. पण तेव्हाही उपग्रह कक्षेत स्थिर करण्यात आपल्याला अपयश आले.---------२००६ साली १० जुलै रोजी जीएसएलव्ही तंत्रज्ञानाद्वारे भारताने इनसॅट-४सी उपग्रह घेऊन आकाशात झेप घेतली खरी, पण ते मध्येच बिघडले आणि रॉकेट समुद्रात कोसळले.------------२०१० साली एप्रिल महिन्यात आपण जीसॅट-३ हा उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. पण तेही अर्ध्या रस्त्यात बिघडले आणि समुद्रात बुडाले.--------------पुन्हा त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात जीएसएलव्हीच्या प्रक्षेपणावेळीच पहिल्याच टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला. संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या भारताच्या या मोहिमेत अपयश आले.-----------------नव्या ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’मुळे ...खगोलीय घटना आणि वस्तूंची सखोल माहिती मिळू शकेल. एकाच वेळी विद्युत चुंबकीय तरंगलहरींच्या एका रुंद पट्ट्याचं निरीक्षण करणं सोप होईल.आतापर्यंत जगामध्ये अनेक दुर्बिणी अवकाशात सोडण्यात आल्या. परंतु त्यांच्या निरीक्षण क्षमतेपेक्षा अधिक विकसित निरीक्षण करण्याची क्षमता भारताच्या ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’मध्ये असल्यामुळेच ही मोेहीम नासाच्या एक पाऊल पुढे मानण्यात येत आहे.उमदे नेतृत्व... आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यशाला सर्वाधिक महत्त्व असते आणि यशाला वाटेकरी खूप असतात, ही गोष्ट ओळखूनच भारतीय अवकाश संशोधन संघटनेचे म्हणजेच इस्रोचे दुसरे अध्यक्ष प्रा. सतीश धवन यांनी अपयशी मोहिमांची जबाबदारी मोठेपणानं स्वीकारली आणि यशासाठी आपल्या सहकाऱ्यांना पुढे करण्याचा उमदेपणा दाखवला. ही हकीकत दस्तुरखुद्द माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांनी नेतृत्वाविषयी बोलताना अनेकदा स्पष्ट केली.