शहरं
Join us  
Trending Stories
1
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
2
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
6
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
7
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
8
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
9
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
10
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
11
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
12
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
13
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
14
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
15
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
16
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
17
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
18
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
19
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
20
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

‘मंगळ यान’ ‘ब्लॅक आऊट’ टप्प्यात

By admin | Updated: June 7, 2015 23:18 IST

मंगळ ग्रहाचे परिभ्रमण करीत असलेले भारताचे पहिले आंतरग्रहीय मिशन ‘मंगळ यान’ आज सोमवारपासून १५ दिवसांच्या ‘ब्लॅक आऊट’ स्थितीत प्रवेश करणार आहे.

बंगळुरू : मंगळ ग्रहाचे परिभ्रमण करीत असलेले भारताचे पहिले आंतरग्रहीय मिशन ‘मंगळ यान’ आज सोमवारपासून १५ दिवसांच्या ‘ब्लॅक आऊट’ स्थितीत प्रवेश करणार आहे. या अवस्थेत मंगळ यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटलेला असेल.८ ते २२ जून या काळात मंगळ आणि पृथ्वी यांच्या मध्ये सूर्य आल्याकारणाने मंगळ यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटणार आहे. या काळात मंगळ यान ‘स्वचलित मोड’वर कार्यरत राहील आणि स्वत:च स्वत:ला निर्देश देईल. मंगळ यान अशा १५ दिवसांच्या सुप्तावस्थेत (ब्लॅक आऊट) जाण्याची आणि त्याचा पृथ्वीसोबत असलेला संपर्क विच्छेद होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ही सुप्तावस्था संपल्यानंतर मात्र मंगळ यानाचा पुन्हा पृथ्वीशी संपर्क स्थापित केला जाईल, असे इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ४५० कोटी रुपये खर्चाच्या या मंगळ यानाचा सहा महिन्यांचा कार्यकाळ मार्चमध्ये समाप्त झाला होता; परंतु इंधन शिल्लक राहिल्यामुळे त्याचा कार्यकाळ आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आला होता. मंगळ यान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी पीएसएलव्हीद्वारे आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते आणि ते नऊ महिन्यांनंतर २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थापित करण्यात आले होते.‘ब्लॅक आऊट’दरम्यान मंगळ यान एका ‘स्वतंत्र मोड’मध्ये जाईल आणि स्वत:च आपला निर्णय घेईल. १५ दिवसांच्या दीर्घ अवधीपर्यंत मंगळ यानाशी संपर्क न राहण्याची ही पहिलीच वेळ असेल, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्याने सांगितले.हा ‘ब्लॅक आऊट’चा काळ संपल्यानंतर उपग्रहावर पुन्हा नियंत्रण मिळविले जाईल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला. मंगळ यानाला ब्लॅक आऊटसाठी तयार केले जात आहे. आता आम्ही या अंतराळ यानाला कोणताही संदेश पाठविणे थांबविले आहे. ८ जूनपर्यंत दररोज दोन ते तीन तासांचे संकेत मंगळ यानाला पाठविले जातील. या मिशनची मुदत आणखी वाढविण्यात आली तर पुढच्या वर्षीदेखील हे मंगळयान ब्लॅक आऊट टप्प्यातून जाईल. (वृत्तसंस्था)