शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी अण्णाद्रमुकमधून निष्कासित

By admin | Updated: February 17, 2017 20:32 IST

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनाच अण्णाद्रमुकमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 17 - तामिळनाडूमधील सत्ता संघर्षाचा वाद काही शमण्याची चिन्हे नाहीत. अण्णाद्रमुकमध्ये शशिकला आणि ओ. पनीरसेल्वम यांच्यात वर्चस्वाची लढाईचा कलगीतुरा रंगला आहे. तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनाच अण्णाद्रमुकमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कालच त्यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज हे राजकीयनाट्य घडलं आहे. ओ. पनीरसेल्वम यांच्या गटानं शशिकला आणि त्यांच्या दोन नातेवाईकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच पलानीस्वामीसह 13 जिल्हा सचिवांना बरखास्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अण्णाद्रमुकच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या ई. मधुसुदननं यांनीच हा निर्णय घेतला आहे. मधुसुदननं म्हणाले, शशिकला यांनी जयललितांशी केलेल्या वचनांचा भंग केला आहे. त्यावेळी त्यांनी राजकारण उतरणार नसल्याचं सांगितलं होतं. सरकारमध्ये भाग घेण्याची कोणतीही इच्छा नसल्याचं त्यांनी जयललिता यांना सांगितलं होतं. मधुसुदननं यांनी अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनाही शशिकलांशी कोणताही संबंध न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. शशिकला यांना हटवल्यानंतर मधुसुदननं यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी, लोकसभा उपाध्यक्ष एम. थंबीदुराई, मंत्रि डिंडिगुल सी. श्रीनिवासन, पी. थैंगमानी, सी. व्ही. षडमुगम, के. राजू. आर. बी उदयकुमार आणि राज्यसभा खासदार ए. नवनीत कृष्णन यांची अण्णाद्रमुकची प्राथमिक सदस्यता रद्द केली आहे.