शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

तामिळनाडू विधानसभेचा बनला आखाडा सभागृहात तोडफोड : डीएमडीकेच्या आमदारांना बाहेर काढले

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

चेन्नई : अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्याबद्दल विरोधी पक्षाचे उपनेते अझागापूरम मोहनराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर गुरुवारी तामिळनाडू विधानसभेचा आखाडा बनला. अभूतपूर्व गदारोळात देसिया मुरपोक्कू द्रविडा कझगमच्या (डीएमडीके) सदस्यांनी दस्तऐवज फेकले आणि विधानसभाध्यक्षांच्या कक्षाच्या काही भागाची नासधूस केली.

चेन्नई : अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्याबद्दल विरोधी पक्षाचे उपनेते अझागापूरम मोहनराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर गुरुवारी तामिळनाडू विधानसभेचा आखाडा बनला. अभूतपूर्व गदारोळात देसिया मुरपोक्कू द्रविडा कझगमच्या (डीएमडीके) सदस्यांनी दस्तऐवज फेकले आणि विधानसभाध्यक्षांच्या कक्षाच्या काही भागाची नासधूस केली.
मोहनराज यांनी जयललिता यांच्या नावाचा उल्लेख न करता केलेल्या टिप्पणीवर अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अण्णा द्रमुकच्या १५१ आमदारांनी एकमुखी मागणी रेटून धरली असता विधानसभाध्यक्षांनी मोहनराज यांचे विधान कामकाजातून वगळण्याचा आदेश दिला. मोहनराज यांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढण्याचा आदेश दिल्यानंतर अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले.
डीएमडीकेचे सदस्य विधानसभाध्यक्षांच्या आसनासमोर धावले आणि त्यांनी आदेश रोखण्याची मागणी केली. या पक्षाचे प्रतोद व्ही.सी. चंद्रकुमार यांनी तर मार्शलला अडविण्याचा प्रयत्न केला. मार्शलनी डीएमडीकेच्या आमदारांना घेराव घालत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा या आमदारांनी जोरदार नारेबाजी करीत विधानसभाध्यक्षांची कृती पक्षपाती असल्याचा आरोप केला. डीएमडीकेच्या आमदारांनी विधानसभाध्यक्षाच्या कक्षाचा तोडलेला भाग समोर ढकलला आणि कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली. दरम्यान, या पक्षाच्या आमदारांचा मुद्दा हक्कभंग समितीकडे सोपविण्यात आला. सभागृहाबाहेर लॉनमध्ये आलेल्या आमदारांनी घोषणाबाजी चालूच ठेवली होती. (वृत्तसंस्था)
---------------------------
विधानसभेच्या इतिहासातील
काळा दिवस
हा विधानसभेच्या इतिहासातील अतिशय वाईट दिवस असल्याचा शेेरा विधानसभाध्यक्षांनी मारला. आमदारांनी माझ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या कक्षाची तोडफोड केली. कागदपत्रे फाडून टाकली. सभागृहाने हे बघितले आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. या आमदारांवर कोणती कारवाई करावी याबाबत मी सभागृहाच्या नेत्यांशी चर्चा करीन, असे ते म्हणाले.
----------------------
हल्ला जीवघेणा
चंद्रकुमार यांनी विधानसभाध्यक्षांवर केलेला हल्ला जीवघेणा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाथम विश्वनाथन यांनी केला. चंद्रकुमार आणि डीएमडीकेच्या अन्य आमदारांना उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला. सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न हे पाशवी कृत्य असून मोठा कलंक आहे. कागदपत्रे फेकण्यात आली. मार्शलची कॅप हिसकाविण्यात आली. हा मोठा गुन्हा आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर हा प्रस्ताव सभागृहाने पारित केला.