शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी आणि बायडेन यांच्यात फोन पे चर्चा, कोरोनासह विविध मुद्यांवर झाली बातचित

By बाळकृष्ण परब | Updated: November 18, 2020 08:32 IST

Modi-Biden News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली.

ठळक मुद्देभारत आणि अमेरिकेमधील रणनीतिक भागीदारीसाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार मोदी आणि बायडेन यांच्यात कोरोनाची साथ, जागतिक तापमान वाढ आणि भारत-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्याबाबतही चर्चा झाली३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार असलेल्या जो बायडेन यांनी ३०६ मते मिळवली होती

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोदींनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल बायडेन यांचे अभिनंदन केले. यादरम्यान, मोदी आणि बायडेन यांच्यात कोरोनाची साथ, जागतिक तापमान वाढ आणि भारत-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्याबाबतही चर्चा झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. त्यात ते म्हणाले की, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आम्ही भारत आणि अमेरिकेमधील रणनीतिक भागीदारीसाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच कोविड-१९ ची साथ, हवामानातील बदल आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्र यासारख्या संयुक्त मुद्द्यांवर चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्राध्यक्षच्या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले. कमला हॅरिस यांचे यश हे भारत आणि अमेरिकी समुदायाच्या लोकांसाठी गर्व आणि प्रेरणेचा विषय आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी मोदींनी अध्यक्षीय निवडणूक जिंकल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले होते. भारत आणि अमेरिकेमधील संबंध अधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र मिळून काम करण्याची आशा व्यक्त करतो, असे म्हटले होते. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार असलेल्या जो बायडेन यांनी ३०६ मते मिळवली होती. तर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ २३२ मतांवर समाधान मानावे लागले होते. ५३८ इलेक्टोरल व्होट असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी २६८ मतांची आवश्यकता असते.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनUS ElectionAmerica ElectionUnited Statesअमेरिका