शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

उत्तर प्रदेशच्या घटनेचा बदला घेऊ

By admin | Updated: October 3, 2015 03:28 IST

उत्तर प्रदेशातील मोहम्मद इकलाख यांच्या हत्येचा बदला घेऊ, अशी धमकी इसिसमध्ये सामील झालेल्या कल्याणच्या फहाद शेख याने दिली आहे

डिप्पी वांकाणी , मुंबईउत्तर प्रदेशातील मोहम्मद इकलाख यांच्या हत्येचा बदला घेऊ, अशी धमकी इसिसमध्ये सामील झालेल्या कल्याणच्या फहाद शेख याने दिली आहे. टिष्ट्वटरवरील धमकीत फहाद शेख म्हणतो की, भारतातील मुस्लीम जरी आमचा द्वेष करीत असले तरी आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि गुजरात, काश्मीर आणि मुजफ्फरनगरच्या घटनांचा आम्ही निश्चितच बदला घेऊ.गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशात एका मुस्लीम व्यक्तीची हत्या झाल्यानंतर देशात या घटनेचे पडसाद उमटत असताना थेट इसिसनेच याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. कल्याणचे चार युवक मागील वर्षी अचानक गायब झाले आणि ते इसिसमध्ये सहभागी झाल्याचे नंतर उघड झाले. यातीलच एक फहाद शेख याने शुक्रवारी टिष्ट्वट करून ही धमकी दिली आहे. फहाद नावाची एक डझन अकाउंट आतापर्यंत बंद करण्यात आली आहेत; पण पुन्हा नव्याने या नावाने अकाउंट ओपन केली जातात.टिष्ट्वटमध्ये फहाद म्हणतो की, भारतातील हिंदू एकीकडे गोमांस भक्षणाच्या संशयावरून एका मुस्लिमाची हत्या करतात तेव्हा भारतातील मुस्लीम दुसरीकडे शांतता बैठका घेत असतात. अन्य एका टिष्ट्वटमध्ये फहाद म्हणतो की, भारतातील मुस्लिमांवर आम्ही प्रेम करतो, भलेही ते आमचा तिरस्कार करीत असतील. फहादच्या या टिष्ट्वटरचे १०२८ फॉलोअर्स आहेत.फहादने गुरुवारी अरीब माजीदचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यात बंदूक आणि एक बाइक दिसत होती. इसिसच्या काही लोकांसोबत हा फोटो काढण्यात आला होता. जे चार युवक कल्याणहून इसिसमध्ये गेले होते त्यातील अरीब हा परत आलेला आहे. इसिसमधून परतलेल्या अरीबने सांगितले होते की, भारतीयांना तिथे क्षुद्र कामे सांगितली जातात. यावर फहादने टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, येथे राहण्यापेक्षा इसिसमध्ये टॉयलेट साफ करणे केव्हाही चांगलेच आहे.