शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईदवर विश्वासार्ह कारवाई करा, भारतानं पाकला ठणकावलं

By admin | Updated: January 31, 2017 20:33 IST

भारतातील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उल-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानकडून सध्या नजरकैदेत ठेवण्यात आलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - भारतातील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उल-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानकडून सध्या नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भात भारतानेही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्ताननं हाफिज सईदवर फक्त दाखवण्यापुरती कारवाई न करता विश्वासार्ह कारवाई करावी, असं वक्तव्य भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी केलं आहे. नियंत्रण रेषेपलीकडच्या दहशतवादावर पाकिस्तानने कारवाई केली तरच ते दहशतवादासंदर्भात किती गंभीर हे समजेल, असंही ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे याआधीही हाफिज सईदला पाकिस्तानकडून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 13 डिसेंबर 2001मध्ये भारतीय संसदेवरील हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदला पाकिस्ताननं ताब्यात घेऊन मार्च 2002ला त्याची सुटका करण्यात आली होती. अमेरिकेच्या दबावामुळेच सईदला नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती पाकिस्तान संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. (VIDEO : नरेंद्र मोदींच्या दबावामुळेच नजरकैद - हाफिज सईद)(26/11 चा सूत्रधार हाफिझ सईद नजरकैदेत)ट्रम्प यांनी मुस्लिम देशांबाबत कठोर निर्णय घेतला आहे. पाकिस्तानवरही कारवाई करण्याचं ते खुलेपणाने बोलत आहेत. त्यामुळेच आम्ही कारवाई केल्याचं पाकिस्तान संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे.