शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात घ्या
By admin | Updated: March 13, 2016 00:05 IST
जळगाव- छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केंद्रीय अभ्यासक्रमात घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, पण त्याची अंमलबजावणी, पाठपुरावा केला जावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे. केंद्रीय अभ्यासक्रमात फक्त सहा ओळींचा अभ्यास छत्रपती शिवाजी यांच्याबाबत आहे. याबाबत हिंदू जनजागृती समितीने आठ वर्षे आंदोलन चालविले आहे. मागील सरकारांनी याबाबत दुर्लक्ष केले. जॉन याने शिवरायांना वाचविले, असे शिकविले जाते. हा खोटा इतिहास आहे. तो बदलविण्यात यावा, अशी मागणी राज्यसंघटक सुनील घनवट यांनी केली आहे.