शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची घ्या काळजी, नाहीतर गमवाल पगार

By admin | Updated: February 8, 2017 13:15 IST

पालकांचा सांभाळ केला नाही तर पगार कापण्यात येईल, असा नवा नियम अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आहे.

 ऑनलाइन लोकमत

गुवाहाटी, दि. 8 - आसाममधील भाजपाप्रणीत एनडीए सरकारने त्यांचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. आसामचे अर्थमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, तरुणवर्ण, महिला याव्यतिरिक्त पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 
 
यावेळी शर्मा यांनी सरकारी कर्मचा-यांच्या वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्यासंदर्भात एक अनोखा प्रस्तावही सादर केला. जे सरकारी कर्मचारी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेणार नाही, त्यांचा सांभाळ करणार नाहीत, अशा कर्मचा-यांच्या पगारातून एका हिस्सा कापला जाईल, आणि तोच हिस्सा त्यांच्या आईवडिलांना देण्यात येईल, असा नवीन नियम यावेळी त्यांनी जाहीर केला. 
 
शर्मा यांनी सांगितले की, 'वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सरकारी सेवेत असणारा कर्मचारी आईवडिलांची काळजी घेऊ शकत नसेल तर सरकारकडून कर्मचा-यांच्या पगारातून काही हिस्सा कापून त्यांच्या आईवडिलांना दिला जाईल'.  
 
दरम्यान, शर्मा यांनी 2017-18 वर्षासाठी राज्याचा  2,349.79 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शैक्षणिक संस्थांसाठी जवळपास 1,000 कोटी रुपये, चहाच्या बागेत काम करणा-या मजुरांसाठी  287 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  शिवाय, तीन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दोन वैद्यकीय महाविद्यालयांसहीत 34 नवीन महाविद्यालयांची घोषणा केली.