घरासमोरून दुचाकी लांबविली
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
संगमनेर : अज्ञात चोरट्याने घरासमोरून दुचाकी चोरून नेल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घरासमोरून दुचाकी लांबविली
संगमनेर : अज्ञात चोरट्याने घरासमोरून दुचाकी चोरून नेल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांची माहिती अशी, शहरातील पार्श्वनाथ गल्लीत राहणारे सतीश राधेश्याम अग्रवाल यांनी सोमवारी रात्री ९ वाजता काळ्या रंगाची हिरो होंडा ( एम.एच.१७, ए.एम.३६००) ही दुचाकी लॉक करून घरासमोर उभी केली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने रात्रीतून दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी अग्रवाल यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी नोंद केली आहे. (प्रतिनिधी)