तलवार घेऊन दहशत पसरवणारा अटकेत
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
सोलापूर : हातात तलवार घेऊन पेंटर चौकातील सार्वजनिक रोडवर दहशत पसरवून शहराच्या शांततेला धोका निर्माण करणार्या अ?ल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोबीन अब्दुल रजाक सालार (वय 28, रा. काडादी चाळ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
तलवार घेऊन दहशत पसरवणारा अटकेत
सोलापूर : हातात तलवार घेऊन पेंटर चौकातील सार्वजनिक रोडवर दहशत पसरवून शहराच्या शांततेला धोका निर्माण करणार्या अ?ल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोबीन अब्दुल रजाक सालार (वय 28, रा. काडादी चाळ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रविवारी शहरातील काही भागांमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा होत होता. उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातही पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची विविध पथके गस्त घालत होती. गुन्हे शाखेचे फौजदार गंगाधर जोगधनकर आणि त्यांचे सहकारी गस्त घालत असताना पेंटर चौकात आले. त्यावेळी सालार हा गुन्हेगार तलवार घेऊन वावरत होता. फौजदार जोगधनकर यांनी त्यास अटक केली. जेलरोड पोलीस ठाण्यात सालारवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त बालसिंग रजपूत, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर जिरगे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार गंगाधर जोगधनकर, हवालदार रामदास गायकवाड, नीलकंठ तोटदार, मदन गायकवाड, पोलीस नाईक युसूफ काझी, नाना उबाळे, विठ्ठल भोसले, राजेंद्र खारे यांनी ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)